Foreigners in India esakal
आपल्या देशातील अनेक विद्यार्थी परदेशात राहतात, त्याचप्रमाणं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हे परदेशी लोक नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्तानं भारतात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या परदेशी नागरिकांची संख्या किती आहे.सध्या रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरूय. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. याचदरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.पण, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या देशातील अनेक लोक परदेशात राहतात, त्याचप्रमाणं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्याही मोठी आहे. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आलीय. इथं भारतातही अनेक देशांतील नागरिक आणि विद्यार्थी नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं वास्तव करत आहेत. लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 2016 मध्ये 72172, 2017 मध्ये 70463, 2018 मध्ये 72268, 2019 मध्ये 74689, 2020 मध्ये 20561 आणि 2021 मध्ये 23439 विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हे विद्यार्थी व्हिसा घेऊन भारतात राहायला आले आहेत.मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2 डिसेंबर 2021 पर्यंत 20,607 परदेशी रोजगार व्हिसावर भारतात राहत आहेत. यातील बहुतांश लोक कोरिया, जपान आणि चीनमधील आहेत. त्यामध्ये कोरियाचे 4748, जपान 4038 आणि चीनचे सुमारे 1700 नागरिक इथं राहतात.तर अमेरिकेतील 1000 हून अधिक नागरिक रोजगार व्हिसावर भारतात आहेत. याशिवाय ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, मलेशिया येथील लोकही मोठ्या संख्येनं इथं राहत आहेत.याशिवाय, 1 जानेवारी 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत 41,51,758 परदेशी लोकांनी भारत सोडला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.