Mehandi Design 
फोटोग्राफी

Photos: कोणती मेहंदी काढायची प्रश्न पडलाय? पाहा सोप्या अन् सुंदर डिझाईन

शृंगारमध्ये मेहंदी अत्यंत शुभ मानली जाते

सकाळ डिजिटल टीम

येत्या १० एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमी हिंदू दिनदर्शिकेतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी येते. चैत्र महिन्यातील रामनवमीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्रीचे 9 दिवस उपवास करून माँ दुर्गेचे भक्त पूजा करतात. माँ दुर्गाला सोलाह शृंगार वस्तू अर्पण केल्या जातात. शृंगारमध्ये मेहंदी अत्यंत शुभ मानली जाते. सोबतच रमजानचा महिना सुरु आहे. त्यामुळे मेहंदी काढण्यात मुस्लिम महिलांनाही आणखी रस असतो. अनेकदा आपल्याला कोणती मेहंदी काढायची हा प्रश्न पडतो. यासाठी खालील काही सोप्या मेहंदी डिझाइनची मदत तुम्ही घेऊ शकता. (Easy Mehandi design)

कोणत्याही शुभ कार्यक्रमात मेहंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सोप्या मेहंदी डिझाईन च्या मदतीने तुमचा हात अधिक सुंदर दिसणार.
मेहंदीकाढणं ही एक कला आहे. त्याच्या अनेक डिझाईन्स असतात. काही कठीण असतात तर काही सोप्या. मात्र जेव्हा तुम्ही हातावर मेहंदी काढता, तेव्हा हाताची शोभा वाढते आणि तुमच्या सौंदर्यात भर पडते.
मेहंदीला भारतीय समाजात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावणे पंसत करतातच, पण खास करून लग्नात मेहंदी अनिवार्य असते.
मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीची आहे. खूप आधीपासून स्त्रिया मेहंदी लावत आहेत. पण काळ बदलला तशी पद्धत आणि डिजाईन सुद्धा बदलली.आजही स्त्रियांना डार्क मेहंदी हवीहवीशी वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT