फोटोग्राफी

SPEED DATING करायचा विचार करताय? या चार गोष्टी लक्षात ठेवा

एलिजिबल सिंगल्स एकमेकांना जाणून घेण्यासाठी हा पर्याय आहे

सकाळ डिजिटल टीम
नेहमीच्या चाकोरीबद्ध प्रेमात पडण्याच्या, लग्न करण्याच्या प्रक्रियेला तुम्ही कंटाळला आहात का? काही वेगळे प्रयत्न करण्याचे धाडस तुमच्यात आहे का? ऐकायला वेगळे वाटेल पण सध्या काहीजण स्पीड डेटिंग करतायत. मुळात स्पीड डेटिंग ही मॅचमेकिंग सारखी प्रक्रिया आहे. ज्यात एलिजिबल सिंगल्स एकमेकांना जाणून घेण्यासाठी, भेटण्यास उत्सुक असतात. जर तुम्ही अशाप्रकारे थोडा वेळ डेट करून तुमचे रिलेशन पुढे नेण्यास उत्सुक असाल तर नक्की ही संकल्पना कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी चार गोष्टी लक्षात ठेवा.
कंफर्टेबल वाटू द्या - स्पीड डेटींगचा प्रयत्न करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, डेटींग करताना तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर कंफर्टेबल वाटेल. यावेळी तुम्ही पार्टनरचे कौतुक, काही विनोद सांगून सुरवातीला तुमच्यातले संभाषण हलके-फुलके राहील यासाठी प्रयत्न करू शकता.
बाता मारू नका - तुम्ही कुठल्याही बाता मारू नका, स्वतःशी प्रामाणिक राहा. बतावण्या मारलात तर तुमच्या डेटवर परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्हाला खरोखरच आवडणारी व्यक्ती मिळण्याची शक्यताही कमी होईल.
संवाद वाढीवर भर द्या - तुम्ही संवादात नीट बोलला नाहीत किंवा फोनकडेच लक्ष देत बसलात, तर अशावेळी ते दिसायला योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुमच्यातला संवाद इंटरेस्टींग होईल यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही तुमच्यातील संवाद पुढे नेण्यासाठी प्रयत्न करताय, हे यातून लक्षात येईल.
थेट विषयावर या - नावाप्रमाणेच, स्पीड डेटिंग हे फार कमी वेळात एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यावर पुढे जायचं की नाही हे अवलंबून असल्याने जुजबी बोलून झाल्यावर तुमही थेट एकमेकांशी थेट संवाद साधा. अघळपघळ, इकडच्या-तिकडच्या गप्पा टाळाच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT