James Anderson completes 650 wickets in Tests sakal
फोटोग्राफी

वयाच्या तिशीत इंग्लंडच्या जेम्सचा अनोखा विक्रम, सचिनला टाकलं मागे

जेम्स अँडरसनने 650 विकेट पूर्ण करत रचला इतिहास

Kiran Mahanavar

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला आहे. 39 वर्षीय अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टॉम लॅथमला बाद करून कसोटी क्रिकेटमधील आपली 650 विकेट पूर्ण केली. क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज आहे. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनाही मागे टाकत आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. (James Anderson completes 650 wickets in Tests)

जेम्स अँडरसन वयाच्या ३० वर्षानंतर १०० कसोटी सामने खेळणारा जगातील दुसऱ्या क्रिकेटपटू ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटीत मैदानावर उतरल्यावर त्याने ही कामगिरी केली. अँडरसनचा देशबांधव यष्टिरक्षक अॅलेक स्टीवर्ट या यादीत पहिला क्रमांकावर आहे, ज्याने वयाच्या 30 व्या वर्षापासून 107 कसोटी सामने खेळले आहेत.
सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाची भिंत म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड यांनी तब्बल 30 वर्षांनंतर असेच 95-95 कसोटी सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने 30 ओलांडल्यानंतर 92 कसोटी सामने खेळले आहे.
जेम्स अँडरसन हा मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्ननंतर कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथैया मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यात 800 बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 बळी घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT