फोटोग्राफी

भंडारा जिल्ह्यात दिसले विदेशी पक्षी; विदर्भ स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण

नीलेश डाखोरे

भंडारा : विदर्भ हे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण (Vidarbha is a favorite destination of native and exotic migratory birds) झाले आहे. विदर्भातील महत्त्वाच्या नद्या, तलाव व इतर पाणथळांची ठिकाणे खास पाहुण्यांनी गजबजून गेली. गोंदिया, भंडारा व नवेगाव येथील जलाशय विदेशी पक्ष्यांची नोंद झाली आहे. ऋतूनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्याने खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, घरटी बांधण्यासाठी आवश्‍यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे पक्षी स्थलांतर करीत असतात (Birds are migrating for many reasons).

भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, मध्य आशिया, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, लद्दाख, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागांतून आपल्याकडे पक्षी येत असतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे पक्षी मोठ्या प्रमाणात (Birds come in large numbers in the months of December-January) येतात. भंडारा जिल्‍ह्यातील रावणवाडी, शिवणी बांध, सिरेगाव बांध, रामपुरी, खुर्सीपार बांध, पुरकबोडी, गोसेखुर्द बॅक वॉटर, सौंदड, भुगाव, सोनमाळा, साकोली, गुढरी आदी ठिकाणी विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले.

पक्षांचे स्थलांतर ही पक्षिजीवनामधली विलक्षण घटना आहे. पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात. सदा सर्वकाळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसतिस्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर अशी व्याख्या लॅण्ड्सबरो थॉम्सन या शास्त्रज्ञाने केली आहे. पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास करतात. (फोटो - प्रा. अशोक गायधने, कार्यवाह, ग्रीन फ्रेन्डस नेचर क्लब)

साधी लालसरी (Common Pochard) - पक्षांचे स्थलांतर ही पक्षिजीवनामधली विलक्षण घटना आहे.
कलहंस बदक (Greylag Goose) - पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात.
तलवार बदक (Northern Pintail) - पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT