प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर काही ना काही क्रीम वापरत असतो. पण चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग-धब्बे हे अडथळा बनतात, जे दूर करणे खूप कठीण होते. काही लोक चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी त्वचेची काळजी घेणाऱ्या क्रीम, फेस-वॉश किंवा लोशन किंवा इतर उपाय शोधू लागतात. एवढेच नाही तर काही लोक बाजारातून महागडी क्रीम खरेदी करतात, ज्यामुळे स्किन-इन्फेक्शनसारख्या तक्रारींची शक्यता वाढते. चला तर मग हे घरगुती उपाय वापरुन तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग-धब्बे दूर करु शकता.
टोमॅटो :
टोमॅटो व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असल्याने तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेते. चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी टोमॅटो प्युरी बनवा. नंतर 15 मिनिटांसाठी त्वचेवर मसाज करा आणि थंड पाण्याने धुवा. तुम्ही हे महिन्यातून दोनदा करू शकता.
ताक :
ताक डार्क स्पॉट्स काढण्यासही मदत करते. यासाठी तुम्हाला 4 चमचे ताक आणि 2 चमचे टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवावी लागेल. ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने धुवा. हे आठवड्यातून तीन ते चार वेळा करा.बटाटा: तुम्ही डार्क स्पॉट्स हलके करण्यासाठी बटाटे देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा कापून काळ्या डागांवर ठेवावा लागेल. कोमट पाण्याने चेहरा धुण्यापूर्वी काही मिनिटांसाठी ते ठेवा. बटाटा हे मधामध्ये मिसळून फेस मास्क म्हणून देखील वापरला वापरु शकता.लिंबू :
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेवरील काळे डाग हलके करण्यास मदत करते. यासाठी, तुम्ही चेहऱ्यावरील त्या भागावर लिंबाचा रस चोळू शकता. ते कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा. चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा लिंबू वापरू शकता. तुम्हाला काही आठवड्यांत त्याचा परिणाम दिसू लागेल.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.