जर तुम्ही दिल्ली फिरायला जात असाल तर कुतुब मिनार पाहायला विसरु नका. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे. कुतुब मीनार लाल वाळूच्या दगडापासून बनलेला आहे, ज्यामध्ये सुंदर शैलीचे नकाशे कोरलेली आहेत आणि पवित्र कुराणातील श्लोक कोरलेले आहेत.
हे ऐतिहासिक इमारत इंडो-इस्लामिक आर्किटेक्चर चे उत्तम उदाहरण आहे.हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे. येथील लोखंडी खांब 2000 वर्षांहून अधिक जुना आहे, परंतु आजपर्यंत तो गंजलेला नाही.कुतुबुद्दीन ऐबक यांनी याची सुरुवात केली आणि संत कुतुबुद्दीन बख्तियार यांच्या नावावर कुतुब मिनार नाव ठेवले. कुतुब मिनार चे काम 1199 मध्ये सुरु झाले. आणि 1220 मध्ये पूर्ण बांधून तयार झाले. कुतुब मिनार पूर्ण बांधण्यासाठी 21 वर्षाचा कालावधी लागला. कुतुब मिनारमध्ये अरबी आणि नागरी लिपीमध्ये अनेक शिलालेख आहेत जे त्याचा इतिहास सांगतात.कुतुब मीनारचा वरचा भाग विजेच्या कडकडाटाने नष्ट झाला होता, फिरोजशाह तुघलकने ते खराब झालेले भाग पुन्हा बांधले.अनेकवेळा तेथील दुरुस्ती केल्यामुळे कुतुबमिनार किंचित झुकलेला आहे.कुतुब मिनार ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. याची उंची 72.5 मीटर असून इथे 379 पायऱ्या आहेत, जे त्याच्या शिकरापर्यंत पोहचवते. कुतुब मीनारमध्ये सुंदर शैलीचे नकाशे कोरलेली आहेत आणि पवित्र कुराणातील श्लोक कोरलेले आहेत.त्याच्या आसपासच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये दिल्लीचा लोहस्तंभ, कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद, अलाई दरवाजा, इल्तुतमिशची कब्र, अलाईआली मिनार ही आहेत.4 सप्टेंबर 1981 मध्ये कुतुबमिनार, दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंडल्यामुळे अंधार झाला. त्यामुळे झालेल्या धावपळीत 45 लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून कुतुब मीनारमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.