फोटोग्राफी

एकेकाळचे मुख्यमंत्री पण नंतर साधं पद निभावताना देखील लाजले नाहीत 'हे' नेते

धनश्री ओतारी

३१ ऑक्टोबर २०१४ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीच्या खुर्ची नंतर दुय्यम स्थानावर बसणारे फडणवीस हे पहिलेच नेते नसून यापूर्वीही राज्याने असे नेते पाहिले आहेत.

एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणि आपण स्वतः मंत्रीमंडळा बाहेर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही काळातच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी (J. P. Nadda) आताच फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असा आग्रह केला. आणि फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
कॉंग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांनी १९७५ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सलग ११ वर्षं राहण्याचा विक्रम करणार्‍या वसंतराव नाईक यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५मध्ये तडकाफडकी काढून त्यांच्याऐवजी शंकरराव चव्हाण यांची नेमणूक केली होती. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या या मंत्रिमंडळात शरद पवार हे ऐन तिशीतील सर्वांत तरुण मंत्रीही होते. आणीबाणी पर्वानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या १९७८ साली निवडणुका झाल्या. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील सरकारविरुद्ध बंड करून जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांची मस्का वगैरे पक्षांना एकत्र आणून स्वत:च्या नेतृत्वाखाली ‘पुरोगामी लोकशाही दला’चे वा ‘पुलोद’चे सरकार स्थापन केले होते. याच पुलोद सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण एक मंत्री म्हणून सामिल झाले होते.
शिवाजीराव निलेंगेकर- पाटील हे अतिशय शिस्तप्रिय राजकारणी म्हणून ओळखले जात होते. निलेंगकर-पाटील यांनी राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली होती. जून १९८५ ते मार्च १९८६ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. वर्षांनंतर ते सुशील कुमार शिंदे सरकारमध्ये महसूल मंत्री झाले.
नारायण राणे १९९९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एका वर्षापेक्षा कमी काळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते महसूलमंत्री झाले.
महाराष्ट्र राज्याचे १३ वे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असणारे सुधाकरराव नाईक यांची ओळख पाणीदार नेता अशी होती. १९९१ ते १९९३ दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदी त्यांचं मन रमलं नाही आणि वर्षभरात ते महाराष्ट्रात परत आले. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेची स्थापना केली. आणि जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष पदी मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव नाईकांची निवड केली.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण २००८ ते २०१० दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर २०१९ मध्ये, ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मालिआ सरकारमध्ये पीडब्ल्यूडी मंत्री झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT