father's day : marathi actress shared post for their fathers  sakal
फोटोग्राफी

Father's day : 'या' मराठी अभिनेत्रींनी शेअर केले वडिलांसोबतचे खास फोटो..

आज फादर्स डे निमित्त मराठी अभिनेत्रींनी आपल्या वाडिलांबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.

नीलेश अडसूळ

marathi actress : बाबांचं महत्व खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचं असतं. पण 'फादर्स डे' च्या निमित्तानं याच वडिलांविषयी काही तरी खास बोलण्याची संधी सगळ्यांना सापडते. आजच्या दिवशी अनेक सेलिब्रिटी वडिलांचं कौतुक करत,पोस्ट टाकत व्यक्त झाले आहेत. यामध्ये काही मराठी अभिनेत्रींचाही समावेश आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर, भार्गवी चिरमुले, रूपाली भोसले यांनी आपल्या बाबांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या बालपणीची आठवण शेअर केली आहे. यामध्ये अपूर्वा आपल्या बाबांच्या हाताला धरून चालत आहे. मी तुमच्यासाठी कायम अशीच लहान मुलगी म्हणून राहणार. बाबा तुमची खूप आठवण येते. असं अपूर्वाने लिहिलं आहे.
भार्गवीने देखील आपल्या रियल आणि रील अरयुष्यातील वडिलांचे फोटो शेअर करत दोघांचेही आभार मानले आहे. माझ्यातील आत्मविश्वास तुम्ही जागा केला असं तिने म्हंटलं आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या लहानपणीपासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो कोलाज करत ते पोस्ट केले आहेत. माझे वडील माझे हिरो आहेत असे ती म्हणते.
अभिनेत्री रूपाली भोसले हिने देखील वाडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिले आहे. वडील ते आपल्या आयुष्यात प्रकाशवाट निर्माण करणारे असतात असे कॅपशन तिने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT