Feng Shui Tips 
फोटोग्राफी

लवकर पैसा कमवायचाय? घरी घेऊन यातील एक गोष्ट, झटक्यात आयुष्य बदलेल

घरामध्ये फेंगशुई असल्यास पैशाचा ओघ वाढतो, नोकरी-व्यवसायातही गतीने यश मिळते असं म्हटलं जातं

सकाळ डिजिटल टीम

चीनी वास्तुशास्त्रामध्ये फेंगशुईसंदर्भातील अनेक गोष्टींना शुभ मानले गेले आहे. अशा काही गोष्टी घरात ठेवल्याने सुख आणि संपत्ती मिळते. घरामध्ये फेंगशुई असल्यास पैशाचा ओघ वाढतो आणि नोकरी-व्यवसायातही गतीने यश मिळते, असं म्हटलं जातं. त्यामुळे कष्ट करूनही फळ मिळत नसेल, तर या फेंगशुईच्या वस्तू घरात ठेवा आणि संपत्ती, यश मिळवा.

कासव केवळ फेंगशुईमध्येच नाही तर हिंदू धर्मातही खूप शुभ मानले जाते. घरातील काही ठिकाणी धनदेवी लक्ष्मी वास करत असते असे मानले जाते. घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवल्यास तुमची प्रगती जलद होते.
फेंगशुईमध्ये तीन पायांचा बेडूक अतिशय शुभ मानला जातो. तोंडात नाणी असलेला 3 पायांचा बेडूक घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवल्यास पैशाचा ओघ वेगाने वाढतो. लवकरच आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होऊ शकते.
फेंगशुईमध्ये हसणाऱ्या बुद्धाला खूप शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांचा घरी किंवा ऑफिसमध्ये हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती सहज दिसत असते. जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी अशा बुद्धाला खूप खास मानले जाते. ते आनंदाचे प्रतीक आहे.
फेंगशुईमध्ये क्रिस्टलला म्हणजेच स्फटिकला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. पांढरा स्फटिक जिथे ठेवला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे तो वायव्य दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते.
फेंगशुई नाणीही खूप भाग्यवान मानली जातात. फेंगशुईची नाणी लाल धाग्यात किंवा रिबनमध्ये बांधून ठेवल्याने माणूस लवकर श्रीमंत होतो, असे म्हटंल जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT