Footballer Neymar will not be part of sister rafaela santoss Sakal
त्यामुळेच राफेलाचा बर्थडेच्या वेळी नेमारला दुखापत होणार असल्याची एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
ब्राझील आणि पॅरिस सेंट जर्मेनचा स्टार फुटबॉलपटू नेमार यावेळी आपली बहिण राफेला सँटोस हिच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. मागील चार-पाच वर्षांपासून तो आपल्या बहिणीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिसला. दुखापतीमुळे संघातून बाहेर असल्यामुळे त्याला कार्यक्रमाला हजेरी लावणे शक्य झाले होते, हे देखील त्यामागचे एक कारण होते. त्यामुळेच राफेलाचा बर्थडेच्या वेळी नेमारला दुखापत होणार असल्याची एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. नेमारची बहिण राफेला सँटोसही ब्राझीलीयन मॉडेल आहे. 11 मार्चला तिचा वाढदिवस असून या दिवसाचा कार्यक्रम काय ते अद्यापत तिने स्पष्ट केलेले नाही. राफेला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिला 40 लाख 45 हजारहून अधिक लोक फॉलो करतात.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.