sachin tendulkar and vinod kambli sakal
फोटोग्राफी

Friendship Day : 'एक दिल दो जान'; सचिन अन् विनोद कांबळीच्या आयुष्यातील खास किस्से..

मैत्री दिनानिमित्त सचिन आणि कांबळीच्या आयुष्यातील किस्से जाणून घेऊया.

Kiran Mahanavar

मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते. जगात असे एकही क्षेत्र नाही जिथे मित्रांनी मैत्रीचा आदर्श ठेवला नाही. क्रिकेटच्या दुनियेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी मैत्रीचा नवा आदर्श घालून दिला आहे. मैत्री दिनानिमित्त सचिन आणि कांबळीच्या आयुष्यातील किस्से जाणून घेऊया.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे सुरुवातीचे शिक्षण एकाच शाळेत झाले. जेव्हा ते 10 वर्षांचे होते आणि मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये इयत्ता 7 मध्ये शिकत होते तेव्हापासून त्यांची मैत्री सुरू झाली.
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत शिकत होते, त्या काळात दोघांची भेट रमाकांत आचरेकर यांच्या क्रिकेट कोचिंगमध्ये झाली. येथे प्रशिक्षक रमाकांत यांनी सचिन-कांबळी यांना क्रिकेटचे बारकावे शिकवले. या दोघांनीही त्यांच्या प्रशिक्षकाकडून क्रिकेटशिवाय शिस्तीचे धडे अतिशय गांभीर्याने वाचले.
शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत सचिन आणि कांबळीने फलंदाजीत इतिहास रचला. या स्पर्धेत झेवियर स्कूलविरुद्ध खेळताना त्यांनी ६६४ धावांचा विश्वविक्रम केला. या कामगिरीमुळे या दोन्ही क्रिकेटपटूंना लहान वयातच भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकरला 1989 साली भारतीय संघात स्थान मिळाले. सन 1992 पर्यंत, तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावा करून प्रसिद्धी मिळवली होती, तर 1993 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कांबळीने 14 कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावा करून नवीन विक्रम केला.
सचिन तेंडुलकर सतत क्रिकेटच्या उंचीला स्पर्श करत होता. तर दुसरीकडे विनोद कांबळी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. एकंदरीत कांबळीने 2000 पर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान एका मुलाखती कांबळीने सांगितले की, सचिनने त्याच्या कारकिर्दीत त्याला फारशी मदत केली नाही. यावरून मास्टर ब्लास्टर तेंडुलकर खूप नाराज झाला आणि नंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT