Fruits For Skin esakal
फोटोग्राफी

Fruits For Skin : डाएटमध्ये या 5 फळांचा समावेश असावा; अगदी चाळीशीतही दिसाल शिल्पा शेट्टीसारखं तरुण

जेवणात अनहेल्दी पदार्थांचा समावेश जास्त असेल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो

सकाळ ऑनलाईन टीम

खाण्यापिण्याकडे ज्यांचे विशेष लक्ष नसते त्यांची प्रकृती काय बिघडत असते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्याला योग्य आहार घ्यायला सांगतात. जेवणात अनहेल्दी पदार्थांचा समावेश जास्त असेल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. जे लोक जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातात त्यांना मुरुम आणि सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्या जास्त होतात.

जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर काही फळांना तुमच्या आहाराचा भाग बनवणे फायदेशीर ठरू शकते. फळांमध्ये असलेले अँटी एजींग गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करतात, ज्यामुळे तुमचा चेहरा तरुण दिसतो.

जांभळामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक घटक त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये देखील पपई वापरली जाते. पपई खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते आणि सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या दूर होते.
संत्र्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे अँटी-एजिंग म्हणून काम करते आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरी खाणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीएजींग गुणधर्म आहेत जे सुरकुत्या दूर करण्याचे काम करतात. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते आणि ते त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करते.
सफरचंद स्कीन टाइट आणि ग्लोइंग बनवण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून आराम देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT