गणपती भक्तांवर नेहमी आनंदी असतो. एवढंच नाही, तर भगवान गणेश आपल्या भक्तांच्या आनंदाची विशेष काळजीही घेतो. त्यांचे दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करतो.
Ganesh Chaturthi 2021 : जर तुम्ही देखील घरी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज 10 सप्टेंबरपासून पुढील 10 दिवसांसाठी गणपतीच्या भक्तीत भक्तगण दंग होऊन जाणार आहेत, तर आज घरांत गणपतीची स्थापना आणि पूजा केली जाईल. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्तगण पूजा आणि विविध उपाय करतील. तसं पाहिलं तर गणपतीला प्रसन्न करणं फार कठीण काम नाही.कारण, गणपती भक्तांवर नेहमी आनंदी असतो. एवढंच नाही, तर भगवान गणेश आपल्या भक्तांच्या आनंदाची विशेष काळजीही घेतो. त्यांचे दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करतो. पण, गणेशाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली, तर तुम्ही केवळ बाप्पाचे मनच जिंकू शकत नाही, तर तुमच्या इच्छाही पूर्ण करू शकता. असं असलं तरी, ज्या घरात बाप्पा राहतात, तिथं कोणतंही दुःख किंवा दुर्भाग्य असू शकत नाही.गणपतीचे आवडते फूल : पिवळ्या रंगाचे झेंडूचे फूल गणेशाला खूप प्रिय आहे. तुम्ही मंदिराच्या सजावटीमध्ये कोणत्याही प्रकारच्या फुलांचा वापर करू शकता, परंतु पूजेच्या वेळी गणेशाला पिवळ्या झेंडूची फुलंच अर्पण करा.गणेशाला सिंदूर खूप आवडतो : गणेशाची पूजा करताना एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप करायला हवा. मंत्र : 'सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम् । ॐ गं गणपतये नमः'। हे लक्षात ठेवा, की या मंत्राचा जप करताना तुम्ही गणपतीच्या कपाळावर सिंदूर लावा. मंत्राचा जप केल्यानंतर तेच सिंदूर तुमच्या कपाळावरही लावा.मोदक गणपतीला प्रिय : आजपासून पुढील दहा दिवस गणेशाची पूजा केली जाते. त्याच्या प्रसादात मोदक नसल्याचे क्वचितच पहायला मिळते. वास्तविक, मोदक गणपतीला खूप प्रिय आहे. या उत्सवकाळात गणपतीला पंचपक्वान्न देऊ केले जाऊ शकतात, परंतु मोदकाशिवाय त्यांना कोणताही पदार्थ प्रिय नाही. गणपतीच्या पूजेमध्ये मोदकाचा आवर्जुन समावेश करा.सुख-समृध्दीसाठी या मंत्राचा जप करा - ''इदं अक्षतम् ऊं गं गणपतये नमः' । हे लक्षात ठेवा, की या मंत्राचा जप करताना गणपतीच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करा.पूजेच्यावेळी दररोज या मंत्राचे पठण करा - 'श्री गणाधिपतये नमः'आपल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी - सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम् । ॐ गं गणपतये नमः'। लक्षात ठेवा, की या मंत्राचा जप करताना तुम्ही गणपतीच्या कपाळावर सिंदूर लावा. तद्नंतर तोच सिंदूर आपल्या कपाळावरही लावा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.