गणपती बप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर...! अशा जयघोषात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. गणेश मंडळांनी जयजयकार करत टाळ मृदुंगाच्या गजरात, मोजक्याच कार्यकर्त्यांच्या साथीने गणरायाला निरोप दिला. सर्वांनी भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणरायाला निरोप देताना परिसरातील काही छायाचित्र टिपलेत 'सकाळ'चे उल्हास देऊळगावकर यांनी...
गणपती बप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर...अशा जयघोषात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. गणेश मंडळांनी जयजयकार करत टाळ मृदुंगाच्या गजरात, मोजक्याच कार्यकर्त्यांच्या साथीने गणरायांना निरोप दिला. यंदाही विसर्जनासाठी महापालिकेकडून पाच शहरभर फिरते जलकुडं ठेवले होते. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी दक्षता घेण्यात आली होती. घाट परिसरात तोबा गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. आरती म्हणत आणि चिरमुऱ्यांच्या प्रसादाचे वाटप करत नदीकाठी अनेकांना गर्दी केली होती.तोबा गर्दी झाल्याने, कृष्णाची पाणी पातळी वाढत असल्याने संरक्षणासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. मूर्तीदान केंद्रात यंदाही शुकशूकाट दिसला, आवाहन करूनही नागरिकांनी मूर्तीदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.