अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर मागील महिन्यात दर्शनासाठी खुले झाले. त्यानंतर या महिन्यात मंगळवारी (ता.23) आलेल्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते.मंदिर उघडल्यानंतर पहिली अंगारक चतुर्थी आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा देखिल तेजीत होता.मंदिर उघडल्यानंतर पहिली अंगारक चतुर्थी आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे.अंगारकी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. बाहेरील खेळणी व मिठाई विक्रेते आदल्या रात्रीच पालीत दाखल झाले होते.भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.