आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं म्हणलं तरी आधी रस्त्यावर पाऊल ठेवावं लागतं.
रस्त्याचा वापर केल्याशिवाय बाहेर फिरणंच अशक्य. परंतु युरोपमधील नेदरलॅंड्समध्ये असे एक गाव आहे, जिथे रस्तेच नाहीयेत. या गावाचे नाव गिथॉर्न आहे. या गावामध्ये अतिशय रमणीय वातावरण आहे.स्थानिक लोक या गावात प्रवास करण्यासाठी छोट्या बोटींचा वापर करतात. गिथॉर्न हे गाव वेरबिनबेन-विडेन राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी आहे.या गावामध्ये निसर्ग अतिशय पाहण्यासारखा आहे. तसेच विशेष म्हणजे या गावामध्ये रस्ते नसल्यामुळे लोकांना वाहने वापरता येत नाहीत, यामुळे येथे प्रदूषण होत नाहीत. हे गिथॉर्न गाव अॅमस्टरडॅमच्या ईशान्येस आहे. या गावामध्ये सुमारे 180 पूल आहेत. सर्व रहिवासी पुलावरुन ये-जा करतात.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.