फोटोग्राफी

नवरा असावा तर अस्सा... मुली शोधतात अशा प्रकारचा पार्टनर

सकाळ डिजिटल टीम

मुलींना इम्प्रेस करणं सोपं आहे, असं बऱ्याच मुलांना वाटत. पण आजकाच्या मुली स्मार्ट आणि हुशार आहेत. त्यांना फक्त मुलांचे दिसणे आणि पैसा या गोष्टींपेक्षा त्याच्या सवयी काय आहेत हे कळणे जास्त गरजेचे वाटते. त्यासाठी त्या तुम्हाला व्यवस्थित पारखून घेतात. मगच त्या व्यक्तीला जोडीदार बनवायचे का नाही हे ठरवितात.

खरंतर मुलींना आयुष्यात सिक्युरिटी अर्थातच सुरक्षिततात हवी असते. अशा परिस्थितीत समोरच्याचे वागणे कसे आहे, यावर पैशांपेक्षा जास्त गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुमच्या वागण्याच्या सवयींवरून तुम्ही तिच्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आहात का ते मुली ठरवतात. मुली साधारणपणे या गोष्टी बघतात.

शालीन वागणे- मुलं कोणालाही आकर्षिक करू शकतात. पण मुलींना मुलाचं शालीन वागणं जास्त भावतं. तुमचा अती गमतीदार स्वभाव काहीवेळा बालीश वाटू शकतो. त्यामुळे मुलींशी बोलताना इकडे तिकडे पाहणे टाळा. कोणाच्या येण्याजाण्यावर कमेंट करू नका. या सर्व सवयी असल्यास टाळा. अशा सवयी नसतील तर मुलगी नक्कीच तुमचा विचार करेल.
अतीगोड बोलणे टाळा- खूप गोड बोलणारी मुले मुलींना आवडत नाहीत. गोड गोड बोलताना जर तुम्ही योग्य आणि खऱ्या गोष्टी सांगितल्यास तर त्यावर मुलींचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मुलांनी स्वतःची जास्त स्तुती करणे टाळले पाहिजे. तसेच अनेक मुलांना शिवी देत बोलण्याची सवय असते. मुलींना ही सवय अजिबात आवडत नाही.
मुलींचे अधिक ऐका- मुलींशी बोलताना तुम्ही कमी बोला, तिला जास्त बोलू द्या. तिचे अधिक ऐका. तिला काय आवडते, कधी राग येऊ शकतो हे जाणून घ्या. तिला तुम्ही तिच्या मागेमागे करणार असाल तर तेही आवडणार नाही. त्यामुळे गंभीरपणे पण प्रवाही तिच्याशी संवाद साधा.
आत्मविश्वास हवा - मुलींना जास्त  धाडसी मुले आवडतात. अर्थात प्रत्येक मुलीला तिच्या जोडीदारात जास्त आत्मविश्वा आणि धैर्यशीलपणा हवा असतो. कारण हे गुण जगापासून त्याचे रक्षम करतात. मुलीही अशाच मुलांच्या शोधात असतात. त्यामुळे तुमच्यात जर हे गुण असतील तर मुली सहज तुमच्याकडे आकर्षित होतील, 
तुमचं व्यक्तिमत्व- दिसायला चांगली असलेली मुलं मुलींना आवडतात. त्याव्यतिरिक्त मुली या मुलांचे हसणे, डोळे आणि शरीरयष्टीवरही विशेष लक्ष देता. तुमचा फॅशन सेन्स आणि ज्ञान मुलींना नक्कीच इंप्रेस करेल. मात्र त्यासाठी पुरेशी तयारी ठेवा.
महत्वाकांक्षी स्वभाव - जी मुलं आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहतात, त्यासाठी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतात, अशी मुले मुलींना आवडतात. मुलींची स्वतःची काही स्वप्ने असतात त्या अशा मुलांकडे सहज आकर्षित होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT