कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असणे मोठी गोष्ट नाही पण ते नातं टिकविणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणासोबत पहिल्यांदा डेटवर जात असाल तर तुमच्या मनात कितीतरी प्रश्न मनात असतात. खूप लोक डेटवर जाण्याआधी Nervous असतात. डेटला जाताना काय कपडे घालावे? खायला काय ऑर्डर करावे, बोलायला सुरवात कशी करावी? असे कित्येक प्रश्न मनात घोळत असतात. काळजी करु नका....डेटवर जाताना काय करावे, काय करू नये याच्या महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ड्रेसअपकडे लक्ष द्या : जेव्हा तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये जाता किंवा पहिल्यांदा कोणालातरी भेटता तेव्हा सर्वात आधी लक्ष कपड्यांकडे जाते. पहिल्यांदा डेटवर जाताना असे कपडे वापरा जे तुम्हाला सूट करतील. महागातले कपडे वापरले पाहिजे हे गरजेचे नाही. तुम्ही असे कपडे वापरले पाहिजेत जे घातल्यावर तुम्हाला स्वत:ला आणि दुसऱ्यांना पण चांगले वाटेल. पण हे कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असले पाहिजेत. तुमच्या पार्टनरला वाटले पाहिजे की तुम्ही खूप छान तयार झाला आहात.मोबाईलचा जास्त वापर करू नका : आजकाल लोक आपल्या फोनमध्ये घुसलेले असतात. कित्येकदा ते दुसऱ्यांशी बोलत असले तरी फोनमध्येच लक्ष असते. जर तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असाल तर तिथे पोहचल्यावर थोडावेळ आपल्या फोनपासून लांब रहा. जर फोनमध्ये बिझी राहणार असेल तर तुमच्या पार्टनरला वाटेल की तुमचे त्याकडे लक्ष देत नाही आणि तुमची डेट खराब होईल.रिलॅक्स राहा पहिल्या भेटीचा प्रभाव खूप काळ राहतो. त्यामुळे पहिल्यांदा डेटवर गेल्यावर तुमच्या पार्टनरसोबत आणि इतरांसोबत बोलतना विनम्रपणे वागा. पार्टनरला बोअर होईल किंवा तेथून लवकर जाण्याचा प्रयत्न करतील अशा गोष्टींवर बोलू नका. जेवढी गरज आहे तेवढेच बोला.एकेमकांचे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या : पहिल्यांदा डेटवर जाताना तुमच्या पार्टनरला स्वत:चे मत मांडण्याची संधी द्या आणि अतिशय नम्रपणे आणि शांतते उत्तर द्या. कधीही पार्टनर बोलत असताना मध्येच बोलू नका. गप्पा मारताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जे काही बोलाल ते तिसऱ्या कोणाला ऐकू जाणार नाही. पार्टनरचे पूर्ण बोलून झाल्यावर स्वत:चे म्हणणे मांडा.दिखावा करू नका आजच्या काळा हा दिखाव्याचा काळ आहे असे म्हणतात. पण डेटवर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही पार्टनर सोबत बोलता तेव्हा खूप आजिबात दिखावा करू नका. मोकळेपणाने बोला आणि तुम्ही जे काही बोलता तेव्हा तुम्ही दिखावा करत आहा असे वाटू देऊ नका.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.