Good Habits Esakal
फोटोग्राफी

Good Habits: तरुणपणातच स्वतःला 'या' सवयी लावा; आयुष्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल!

कोणत्याही कामात झोकून काम करायची तयारी दाखवा.

सकाळ डिजिटल टीम

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी कराव्यात.

जास्तीत जास्त प्रवास करा, पण गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा (Travel as much as possible, but keep money for investment) या वयात जितकं होईल तितकं जग फिरुन घ्यावे. कदाचित नंतर येणाऱ्या जवाबदाऱ्यांमुळे जग फिरणे अवघड होईल. पण जग फिरताना पैशांची उधळपट्टी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.
उत्कृष्ट संप्रेषण कौशल्ये विकसित करा (Develop Excellent Communication skills) संवाद साधल्याने बऱ्याच गोष्टी सुटतात. पण त्यासाठी उत्तम संवाद कौशल्ये असली पाहिजेत. त्यासाठी तुमच्या संवादावर चांगलाच अभ्यास असला पाहिजे कंमाड असली पाहिजे. देवाने तोंड दिलं आहे म्हणून काहीही बोलून चालणार नाही. अशाने जवळच्या व्यक्तींना हरवून बसाल.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा (Become Financially Independent) जितकं लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जेव्हा तुम्ही कोणावर अवलंबून असता तेव्हा तुम्ही स्वत:ला कमजोर समजता. आणि त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर फरक दिसू लागतो.
सुक्ष्म निरीक्षण करा (Be More Observing) आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करा. त्यातून योग्य आणि अयोग्य काय आहे याचा विचार करा त्यातून जितक्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील तितक्या शिकून घ्या.
भरपूर वाचा (Read a Lot) 'वाचाल तर वाचाल' हे विधान आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. वाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचनामुळे आयुष्यात काही गोष्टींचे निर्णय घेताना याचा फायदा होतो.
निरोगी अन्न खाणे सुरू करा (Start Eating Healthy) या वयात निरोगी खाण्यावर भर द्या. दारु सिगारेट सारख्या विषाला बळी पडू नका. तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही या जगात वाटेल ते करु शकता. स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य द्या
चौकटीच्या बाहेरचा विचार करा (Be Different) इतरांपेक्षा वेगळं दिसण्यात वेळ वाया घालवू नका. इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी स्वत:मध्ये योग्य ते बदल करा. तुम्ही कौशल्यपूर्ण असाल यावर भर दिल्यास तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल.
मर मर काम करा (die for Work) कोणत्याही कामात झोकून काम करायची तयारी दाखवा. काम करताना परिणामांचा विचार करत बसू नका. मरेपर्यंत काम करण्याची क्षमता ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT