क्षमा बिंदूनं शेवटी स्वतःला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि एका खास विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
गुजरातच्या (Gujarat) क्षमा बिंदूनं (Kshama Bindu) बुधवारी स्वतःशी लग्न केलं. क्षमानं यापूर्वी 11 जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती. मात्र, वाद टाळण्यासाठी तिनं ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधी स्वतःशी लग्न केलंय.क्षमा बिंदूनं शेवटी स्वतःला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि एका खास विवाह सोहळ्यात (Wedding Ceremony) लग्नगाठ बांधली. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचा विधी झाला, मेहेंदीचा कार्यक्रमही पार पडला.वडोदरामधील गोत्री येथील घरात क्षमानं रितीरिवाजांनुसार स्वतःशी लग्न केलं. मात्र, या लग्नात वर किंवा पंडित नव्हते. क्षमाच्या काही खास मित्रांनी या लग्नाला हजेरी लावली होती.भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचं सांगण्यात येत आहे. क्षमानं यापूर्वी 11 जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून तिच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. या लग्नाबाबत शेजाऱ्यांनी तिला विरोध केला होता. क्षमानं सांगितलं की, तिनं ठरलेल्या तारखेपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण, तिला भीती होती की कोणीतरी 11 जून रोजी त्यांच्या घरी येऊन वाद निर्माण करेल. त्यामुळं तिनं बुधवारीच आपलं लग्न केलं.क्षमानं आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजप (BJP) नेत्याच्या विरोधानंतर त्यांनी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंडितांनी लग्नाचा विधी करण्यासही नकार दिला. यानंतर क्षमानं टेपवर मंत्र वाजवून लग्न केलं.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.