सांगलीत (Sangli) नवभारत शिक्षण मंडळ संचलित जनरल एस.पी.पी.थोरात (Lt. Gen. S.P.P.Thorat Academy) अकॅडमीच्यावतीने जिमखाना डेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराटेपासून हॉर्स रायडिंगपर्यंत आणि रोप अॅक्टिव्हीटीपासून कुस्तीपर्यंत सार्या खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आज विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून १९७१ च्या युद्धातले मेजर प्रतापराव शिंदे (Prataprao Shinde) उपस्थित होते. या क्षणाचे छायाचित्रण कैद केले आहेत सकाळचे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी.
सांगलीत नवभारत शिक्षण मंडळ संचलित जनरल एस.पी.पी. थोरात अकॅडमीच्यावतीने जिमखाना डेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.शांतिनिकेतन या शाळेमध्ये १९७१ च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेला रणगाडा आजही शौर्याचे प्रतिक म्हणून उभा आहे. वर्षभर अकॅडमीच्या मुलांनी घेतलेल्या विविध क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक आज सादर केले. एरवी एकलकोंड्यांसारखी मोबाईलमध्ये तोंड घालून बसणारी ही मुले आज घोडदौड करताना, रोप अॅक्टिव्हीटी करताना, मातीत घाम येईपर्यंत कसरती करताना दिसली.जिमखाना डे निमित्त विद्यार्थानी सामुहिक कराटे, ज्युडो प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी त्यांनी सामुहिक कवायतीतुन भारत मातेस वंदन केले.जिमखाना डे निमित्त विद्यार्थांनी मनोरे तयार केले. जिम्नॅस्टिक खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली.जिम्नॅस्टिक खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिक केली. यावेळी हॉर्स रायडिंग, आगीवरुन उड्या मारण्याच्या कसरती सादर केल्या. शौर्य, धाडस व एकात्मतेने मल्लखांब, कराटे, तायक्वांदो, हॉर्सरायडिंग, धनुर्विद्या, कुस्ती, जलतरण या प्रमुख खेळासह विविध खेळांचे हजारो पालकांच्यासमोर सादरीकरण केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून १९७१ च्या युद्धातले मेजर प्रतापराव शिंदे (Prataprao Shinde) उपस्थित होते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.