hanumanche janmasthan anjaneri fort  
फोटोग्राफी

फक्त हनुमानाचा जन्मचं नाही तर अंजनेरी किल्ल्याला मोठा इतिहास जोडला गेलाय

नाशिक जिल्ह्यात हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंधा आहे यावरून हा वाद सुरू आहे.

Kiran Mahanavar

हनुमान जन्मस्थळावरून सध्या नाशिक जिल्ह्यात वाद सुरू आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंधा आहे यावरून हा वाद सुरू आहे. किष्किंधा येथील मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाचे जन्मस्थळ किष्किंधा येथे असल्याचा दावा केला होता. पण त्यांना त्र्यंबकेश्वर येथील ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे.(hanumanche janmasthan anjaneri fort)

नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.
अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वर ६.४ किमी लांब आहे. अंजनेरीची टेकडी सपाट माथ्याची आहे. तिला तीन शिखरे असल्यामुळे ‘त्रिकूट’ म्हणतात.
वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे.
यादवकालात अंजनेरी भरभराटलेली नगरी होती. त्या काळी तेथे जैनांची मोठी वस्ती होती. ११४१ मध्ये बांधलेले चंद्रप्रभ तीर्थंकराचे मंदिर, मठ व धर्मशाळा येथे आढळतात.
एका जैन देवालयात ११४२ चा संस्कृत शिलालेख असून त्यात यादव राजपूत्र सेउणचंद्र याचा उल्लेख आहे. ब्राह्मणी वास्तुकलेचे नमुनेही येथे भरपूर असून गणपतीची मूर्ती व शिवलिंग आढळते.
राघोबादादा उन्हाळ्यात येथे राहत असत. त्या वेळी त्यांच्यासाठी बांधलेले ध्यानमंदीर, तलाव, बाह्मणतळे ही टाकी व फैलखाना येथे असून इंग्रजांनीही हे हवा खाण्याचे ठिकाण बनविले होते.
१,३०९ मी. उंच असलेल्या या ठिकाणी नाशिकहून आजही लोक हवा खाण्यास जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT