आपल्या जादुई आवाजानं भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महान गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या गाण्यांच्या अवीट सुरावटी कित्येक वर्षांपासून श्रोत्यांच्या मनात आहेत. आजही तरुणांना त्यांची गाणी मोहवून टाकतात. बॉलीवूडमध्ये किती ट्रेंड आले आणि गेले मात्र आशाताईंच्या आवाजाला आजही चँलेज नाही हे कित्येकदा दिसून आलं आहे. त्यांचं गाणं नेहमीच टवटवीत वाटतं. केवळ एकाच प्रकारच्या गायकीत अडकून न पडता गाण्यांचे वेगवेगळे प्रकार त्यांनी लीलया सादर केले. आणि आपल्या गायकीतून श्रोत्यांना सुरानंद दिला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्या गाण्यांचा आणि आशाताईंच्या व्यक्तिमत्वाच्या विविध बाबींचा घेतलेला हा आढावा.
आशाताईंनी 1943 मध्ये आपल्या गायनाला प्रारंभ केला. तेव्हापासून ते आतापर्यत आशाताई गात आहेत. त्यांचे गायन हे लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना आपलसं वाटणार आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगातील विविध देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत. आशाताईंनी संगीतातल्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मुशाफिरी केली. त्यांनी गायकीचे अनेक प्रकार अनुभवले. त्यात भावगीतं, प्रेमगीतं, विरहगीत, कवाली, गझल, लावणी, लोकगीतं यासारख्या अनेक प्रकारांमधून त्यांनी श्रोत्यांना आपल्या बहारदार गायकीचा आनंद दिला. आशाताईंनी आतापर्यत बारा हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. केवळ मराठीच नाहीतर देशातल्या वेगवेगळ्या भाषांमधून त्यांनी ही गाणी गायली आहेत. जवळपास वीस भाषांमधून त्यांनी गाणी गायली आहेत. महाराष्ट्रातल्या सांगली शहरात त्यांचा 8 सप्टेंबर 1933 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं मुळ नाव आशा मंगेशकर. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी चला चला नवबाळा नावाचं गाणं गायलं होतं. तर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी 1949 मध्ये रात की राणी या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे गाणी गायली होती. 1960 ते 1970 च्या दशकांत बॉलीवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीचा आवाज म्हणून आशाताईंकडे पाहिलं जात होतं. त्यांनी 1980 मध्ये आर डी बर्मन यांच्याशी लग्न केलं होतं. मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांनी नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है या गाण्यातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आशाजी यांनी पुढे एस डी बर्मन, आर डी बर्मन यांच्यासोबतही काम केलं. त्यातून त्यांना मोठी संधी मिळाली. केवळ गायनच नाही तर त्यांनी काही चित्रपटांमध्येही भूमिका केली आहे. त्यांनी माई नावाच्या मराठी चित्रपटामध्ये भूमिका केली होती. 2011 मध्ये आशा भोसले यांच्या नावाचा गिनिज बूक ऑफ वर्ल्ड मध्ये समावेश झाला होता. 2000 मध्ये त्यांना भारत सरकारनं मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं होतं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांना पद्मविभुषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.