भारतात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आयुष्याला योग्य दिशा आणि आकार देण्यात शिक्षकांचा वाटा महत्वाचा असतो. बॉलीवूडमध्ये देखील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याला प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं बॉलीवूडमधील अशा काही चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत ज्या चित्रपटांनी गुरु आणि शिष्य याबद्दल प्रभावी भाष्य केलं आहे. बॉलीवूडला तसं कोणत्याही विषयाचे वावडे नाही. त्यांनी या आतापर्यत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्मिती केली आहे. बॉलीवूड़मध्ये पाच चित्रपट असे आहेत की जे त्यांच्यातील गुरु आणि शिष्याच्या नात्याविषयी ओळखले जातात. आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
तारे जमीन पर, 2007
आपला शिष्य हा जर कमकुवत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला आधार दिला तर काय होतं, हे जाणून घ्यायचं असेल तर तारे जमीन पर चित्रपट पाहावा. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील संवेदनशीलता अतिशय प्रभावीपणे त्यात साकारण्यात आली आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. आमिर खाननं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. प्रमुख भूमिकाही त्यानं साकारली होती. चक दे इंडिया, 2007 शाहरुख खानच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून चक दे चा उल्लेख करावा लागेल. चक दे मध्ये त्यानं कबीर खान नावाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. आपल्या भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याला कोणत्या संघर्षातून जावं लागतं याचं चित्रणमध्ये पाहायला मिळतं. हॉकी टीमचा कोच ही भूमिका शाहरुखनं दमदारपणे साकारली होती. इक्बाल, 2005
शिकण्याची जिद्द जर मनात असेल तर काहीही अशक्य नाही. हे सांगणारा चित्रपट म्हणजे इक्बाल. प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा आणि श्रेयस तळपदे यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. श्रेयसच्या या चित्रपटातील अभिनयासाठी कौतूकही झाले होते. परिचय, 1972 १९७२ मध्ये आलेल्या या चित्रपटामध्ये जितेंद्र यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यात त्यांनी एका शिक्षकाची भूमिका साकारली होती. मुलांना योग्य वळणावर आणत त्यांच्या आयुष्यात बदल आणण्याचे काम तो करतो. असे त्यात दाखण्यात आले होते. थ्री ईडियट्स, 2009 शिक्षक दिनाच्या दिवशी थ्री इटियट्सचा उल्लेख करावाच लागेल. शिक्षक विद्यार्थ्यांना कसे घडवतात, केवळ वर्गातच नाही तर चार भिंतीच्या पल्याडही मोठी शाळा आहे, त्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे, याची शिकवण देणारा हा चित्रपट आहे. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.