rice crop damage rice crop damage
निलज बु. (भंडारा) : रविवारी सायंकाळी चार वाजतापासून सलग एक-दीड तास पावसामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेले धानाचे पीक (भातपीक) जमीनदोस्त झाले आहे.
मोहाडी व तुमसर तालुक्यात येणाऱ्या निलज बु., निलज खुर्द, देव्हाडा बु., देव्हाडा खुर्द, चारगाव, ढोरवाडा, मोहगाव, मनोरा, नवेगाव बु., मांढळ, व इतर गावांमध्ये चक्रीवादळासारख्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिसरातील शेतकऱ्यांचे धानाचे पीक जमीनदोस्त झालेले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका निलज बु., करडी व देव्हाडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. यापूर्वी तुडतुडा, मावा यांसारखे घातक किडीचा प्रादुर्भाव धानावर झाला होता. त्याने शेतकरी आधीच हतबल झाला होता. मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च खतांचा खर्च इत्यादी खर्च करून शेतकऱ्याचे आधीच कंबरडे मोडले होते. अशात रविवारी सायंकाळी आलेला चक्रीवादळ व पावसामुळे शेतकरी आणखीनच संकटात गेला आहे. शेतकऱ्याचे आणखी संकट म्हणजे, मागच्या वर्षी करडी, निलज बु., देव्हाडा बु., व परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. परंतु, वैनगंगेला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे धानाचे पीक खराब होऊनही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यंदा पीकविमाही काढला नाही.यंदा तरी शासन माय-बापाने शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठवून आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.