heavy rain in rajapur, flood condition 
फोटोग्राफी

Konkan Rain : अर्जुना-कोदवली नद्यांना पूर; राजापूरला पुराचा वेढा, जनजीवन विस्कळीत

सातत्याने पडणारा पाऊस आणि पूराच्या पाण्यात वाढ यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

राजापूर - गेल्या चार दिवसांपासून सततधारा पडणार्‍या पावसामुळे तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आला आहे. या पूराच्या पाण्याने शहराला वेढा घालताना मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जवाहरचौकामध्ये धडक दिली आहे. जवाहर चौकामध्ये सुमारे दोन-अडीच फूट पाणी वाढलेले आहे. शहरातील अनेक भाग पूराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यानंतरही सातत्याने पडणारा पाऊस आणि पूराच्या पाण्यामध्ये होणारी वाढ यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाचा वाढता जोर आणि पूरस्थितीमध्ये राजापूरवासियांसह व्यापारी, प्रशासन यांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना तहसिलदार शितल जाधव, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिल्या आहेत.
पावसामुळे शहरातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याने धोकादायक पातळी ओलांडताना शहरातील काही भाग पूराच्या पाण्याखाली गेला होता. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहीला आहे. त्यातून अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होवून नद्यांना पूर आला आहे
शहरातील जवाहरचौकामध्ये पाण्याने धडक दिली असून जवाहरचौक परिसरासह शिवाजी पथ रस्ता, बंदरधक्का परिसर, वरचीपेठ रस्ता, छोटा पूल आदी परिसर पूराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक आणि रहदारी ठप्प झाली आहे.
शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक टपर्‍यांमध्ये पूराचे पाणी घुसल्याने व्यापार्‍यांची मालाची हलवाहलव करताना पुरती दमछाक झाली आहे. या भागामध्ये पूराचे पाणी घुसल्याने दिवसभर आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
व्यापार्‍यांच्या उरामध्ये पूरस्थितीने पुन्हा एकदा धडकी भरविली आहे. तर, पूरस्थितीमुळे शहरातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आले. जवाहरचौकामध्ये येणार्‍या एस.टी. गाड्याही बंद करण्यात आल्या.
शहराप्रमाणे ग्रामीण भागही पूराच्या पाण्याखाली राहीला आहे. त्यामध्ये नद्यांच्या काठावरील भातशेतीसह रस्ते पूराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
पावसाचा जोर आणि सातत्याने राहीलेल्या या पूरस्थितीमुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. याशिवाय पूरस्थितीमुळे लोकांची वर्दळ ठप्प झालेल्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल रोडावली आहे.
शहरानजीकच्या शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पूराच्या पाण्याखाली राहीला आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना सुमारे दहा-बारा कि.मी. चा वळसा मारून घर गाठावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT