Himesh Reshammiya Birthday know his love life on birthday esakal
फोटोग्राफी

Himesh Reshammiya Birthday: बायकोच्या मैत्रिणीशीच प्रेमप्रकरण अन् २२वर्षानंतर घटस्फोट, हिमेशची लव्हस्टोरी

देखण्या बायकोच्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडलेल्या हिमेशने प्रेमासाठी त्याचं २२ वर्षांचं लग्न संपवत सोनियाशी लग्न केलं.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवुडच्या नामांकित गायकामध्ये नाव असणारा हिमेश रेशमिया आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करतोय. मनाला स्पर्श करणाऱ्या अनोख्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर वेगळी छाप सोडणाऱ्या हिमेश रेशमियाची लव स्टोरी फार फिल्मी आहे. हिमेशची प्रोफेशनल लाईफ वगळता त्याच्या लवस्टोरीमुळेही हिमेश फार चर्चेत आला होता. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याची लव स्टोरी.

हिमेश रेशमियाने बॉलीवुडला अनेक हिट गाणी दिली आहेत. हिमेशने कठीण काळातून संघर्ष करत त्याचं अस्तित्व निर्माण केलंय. त्यामुळे हिमेश त्याच्या म्युझिक अल्बममध्ये नव्या टॅलेंटला संधी देत असतो. मात्र या कलाकाराची लव लाईफ एका चित्रपटापेक्षा कमी नाही. हिमेशचे लग्न कोमलसोबत झाले असताना हिमेशने गुपचुप सोनिया कपूरशी लग्न केले होते. त्यामुळे तो मधल्या काळात फार चर्चेत आला होता.
सोनिया कपूर ही टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री हिमेशच्या बायकोची चांगली मैत्रीण होती. तिचं हिमेशच्या घरी येणं जाणं होतं. हिमेशच्या बायकोनेच हिमेशला सोनियाशी ओळख करून दिली होती. देखण्या बायकोच्या मैत्रीणीच्याच प्रेमात पडलेल्या हिमेशने प्रेमासाठी त्याचं २२ वर्षांचं लग्न संपवत सोनियाशी लग्न केलं.
हिमेश आणि कोमलचे कधीच वादविवाद झाले नाही त्यामुळे त्यांच्या वेगळे होण्याची बातमी सगळ्यांना थक्क करणारी होती. २०१७ मध्ये त्याच्या प्रेमप्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.
२०१८ मध्ये सोनिया आणि हिमेशने अखेर लग्न केले. हे लग्न त्याने गुपचुप काही जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत केली. नंतर एका मुलाखतीत हिमेशने उघड केलं होतं की, हिमेश आणि कोमल एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT