Holi Beauty Tips 
फोटोग्राफी

Holi Beauty Tips : होळी खेळताना केसांची अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

होळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यावर्षी होळी खेळण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. होळी खेळताना अंगावर भरपूर रंग उडवला जातो. त्यावेळी किती रंग खेळलोय याचे भान राहत नाही. पण होळीनंतर मात्र त्याचे खरे रूप दिसते. या रंगांमुळे केस आणि त्वचा खराब होऊ शकते. केस खराब झाले तर ते पुर्वीसारखे करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे होळी खेळताना केसांची काळजी घेणे गरेजेच आहे. होळी खेळताना केस मोकळे न सोडता पोनी बांधणे गरजेचे आहे. आणखी काय काळजी घ्यावी त्यासाठी या टिप्स.

तेलाने मॉलिश करा नारळाचे तेल - होळी खेळण्याआधी तुम्ही केसांना नारळाच्या तेलाने चांगले मसाज करा. या तेलामध्ये आवश्यक फॅटी ऍसिड आणि जीवनसत्त्वे असतात. ते केसांच्या मुळांभोवती जमा झालेले सेबम काढून केसांच्या वाढीसाठी फायदा देतात. तसेच टाळूचे पोषणही यामुळे चांगले होते.
बदामाचे तेल- रंग खेळण्यापूर्वी तुम्ही केसांना बदामाचे तेल लावू शकता. त्याला असलेले फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन इ केसांना मॉश्चराईज करतात. तसेच केस कोरडे होण्यापासून हे तेल रक्षण करते.
मोहरीचे तेल- अनेक ठिकाणी होळी खेळण्यापूर्वी हे तेल लावले जाते. हे तेल केसांना रासायनिक रंगांपासून वाचविते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि ओमेगा केसांसाठी फायदेशीर असतात
केस कलर केले असतील तर- जर तुम्ही केसांना कलर केला असेल तर अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण तुमचे केस केमिकलमुळे आधीच खराब झालेले असतात. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी खोबरेल तेल केसांच्या मुळांवर चांगले लावा.
सरळ केस असतील तर- ज्या लोकांचे केस सरळ असतात, त्यांचे केस इतके कोरडे नसतात. त्यामुळे या प्रकारचे केस असलेल्या लोकांनी केसाला कोरफड जेल किंवा खोबरेल तेल वापरू वापरावे. असे केल्याने केसांना रंगापासून संरक्षण मिळेल. शिवाय उन आणि धुळीपासूनही त्यांचे रक्षण होईल.
कुरळे केस असतील तर- कुरळे केस असलेल्या लोकांना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, अशा प्रकारचे केस असलेल्यांनी खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई तेल मिसळावे. तसेच केस बऱ्याच प्रमाणात लावल्याने त्यांचे रंगापासून संरक्षण होईल.
हेअर मास्कनी होईल फायदा- होळीनंतर केस धुतल्यावर ते एकदम कोरडे होतात. अशावेळी घरी केलेला हेअर मास्क लावल्यास नक्की फायदा होईल. त्यासाठी ऑलिव्ह ऑईलबरोबर ४ चमचे मध आणि लिंबाचे थोडे थेंब एकत्र करा. हे एकत्र केलेले २० ते २५ मिनिट लावून ठेवा. त्यानंतर माईल्ड शाम्पूने केस धुवा. मास्क तयार करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल, अंड, शिकाकाईचा उपयोग करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT