लग्नात पाळी येणार म्हणून त्रासला आहात? हे घरगुती उपाय करा esakal
फोटोग्राफी

लग्नात पाळी येणार म्हणून त्रासला आहात? हे घरगुती उपाय करा

डॉक्टरकडे जाऊन औषध घ्यायलाही अनेकजण घाबरतात.

सकाळ डिजिटल टीम

लग्न तोंडावर आलंय. त्यात पाळी येणार असल्याने तुम्ही नक्कीच त्रासला असला. डॉक्टरकडे जाऊन औषध घ्यायलाही अनेकजण घाबरतात. कारण अशा औषधांमुळे तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच हार्मोन्समध्येही बिघाड होतो. तसेच पुढच्या महिन्यात पाळी उशीरा येऊन आणखी त्रास होतो. म्हणूनच काही घरगुती उपाय करून तुम्ही पाळी पुढे ढकलू शकता.

मसालेदार पदार्थ टाळा- जर तुम्हाला मासिक पाळी उशीरा यावी असे वाटत असेल तर मिरची, काळी मिरी, लसूण असे पदार्थ खाणे टाळा. मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे पाळी येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
मोहरीचा वापर करा- मोहरीत तांबे, लोह, मॅग्नेशियम आणि सेलिनियम यासारखे घटक असतात. दोन चमचे मोहरीची पावडर एक कप गरम दूधात घालून आठवड्यातून एकदा प्या. त्यामुळे काही दिवस का होईना पाळी पुढे जाईल.
व्हिनेगर- पाळी पुढे ढकल्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. एक ग्लास पाण्यात तीन ते चार चमचे व्हिनेगर टाकून दिवसात दोन ते तीन वेळा प्या. असे केल्याने तुम्ही तीन ते चार दिवसापर्यंत पाळी पुढे ढकलू शकता.
जिलेटीन - एक भांड पाण्यात जिलेटिनचे पॅकट टाकून विरघळवून लगेच प्या. असे केल्याने तुम्ही तीन- ते चार तास पाळी पुढे ढकलू शकता. असे वारंवार केल्याने तुम्हाला पाहिजे तितके दिवस पाळी पुढे ढकलता येऊ शकते. पाळी टाळण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे. मात्र हा उपाय सारखा-सारखा केल्यास नुकसान होऊ शकते.
लिंबू- लिंबामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. पाळी टाळण्यासाठी, जास्त रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी लिंबाचा वापर होऊ शकतो. लिंबू नुसते खाल्ल्यास किंवा त्याचा रस प्यायल्यामुळे मासिक पाळीच्या समस्या कही होतात.
तांदळाचे पाणी- जर पाळी थोडी उशीरा यावी असे वाटत असेल तर तांदळाच्या पाण्यात लिंबाचा रस एकत्र करून प्या. दिवसातून 3 वेळा हे पाणी प्या.
नियमित व्यायाम- नियमित व्यायाम केल्याने मासिक पाळी नियमित येते. पण आता तुम्हाला पाळी टाळायची आहे तर व्यायामात जरा बदल करा. काही जड व्यायाम करण्यावर भर द्या. असे केल्याने तुमची पाळी उशीरा येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : रामाच्या नावे मतं मागणाऱ्यांनी दानचोरीवर बोलायला नको का? राज ठाकरेंचा सवाल

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT