Hruta Durgule, Prateek Shah Instagram
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेनं Hruta Durgule सोशल मीडियावर तिच्या प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
हृताने दिग्दर्शक प्रतीक शाहसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. हृताने हा फोटो पोस्ट केल्यापासून प्रतीक शाह कोण आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. प्रतीक हा दिग्दर्शक असून त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे. दिग्दर्शकासोबतच प्रतीक उत्तम डान्सरसुद्धा आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर तो त्याच्या डान्सिंगचे व्हिडीओ पोस्ट करत असतो.
हृतासोबतच प्रतीकनेही सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली.या दोघांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'दुर्वा', 'फुलपाखरू' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय करत हृता घराघरात पोहोचली. सध्या ती 'मन उडु उडु झालं' या मालिकेत काम करतेय. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.