Hruta Durgule, Prateek Shah Instagram
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेनं काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. दिग्दर्शक प्रतीक शाहला हृता डेट करत आहे.
प्रतीक आणि हृता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.
प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा यांनी अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. मुग्धा यांनी मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं पंढरपूर, बे दुणे साडे चार अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रतीक हा दिग्दर्शक असून त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.
दिग्दर्शकासोबतच प्रतीक उत्तम डान्सरसुद्धा आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर तो त्याच्या डान्सिंगचे व्हिडीओ पोस्ट करत असतो.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.