वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन सुविधेत सध्या सात प्रौढ पेंग्विन (३ नर आणि ४ मादी) आहेत. त्यापैकी दोन प्रजनन जोड्यांनी या वर्षी यशस्वीपणे प्रजनन केले आहे.
डोनाल्ड आणि डेसी या जोडीने एकच अंड दिले आणि १ मे २०२१ रोजी हे नवजात पिल्लू (नर) जन्माला आले. या पिल्लाचे नाव ओरिओ (Oreo) असे ठेवण्यात आले आहे. ओरिओ आता ४ महिन्यांचा असून प्रामुख्याने आई-वडिलांसोबत राहून आणि पालकांनी हळूहळू समुहाची ओळख करून दिल्यामुळे तो आता समूहात उत्तमरित्या मिसळला आहे. इतर पेंग्विनच्या हल्ल्यापासून पालकांनी त्याला स्वत:चे संरक्षण करण्यास शिकवले आहे. आजकाल ओरिओ सतत त्याच्या घरट्यात न जाता मुख्यत: बबल या मादी पेंग्विनसोबत वेळ घालवतो आणि प्रदर्शनी परिसरात फिरतो. ओरिओला आता किशोरवयीन पेंग्विनसारखे आवरण (Juvenile Coat) आले असून सुमारे एक वर्षाचा होईपर्यंत त्याला प्रौढ पेंग्विनप्रमाणे आवरण (adult coat) येईल. ओरिओ आता प्रौढ पेंग्विनप्रमाणे मासे खातो आणि आता त्याला कोणत्याही विशेष आहाराची आवश्यकता नाही. मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने एकच अंड दिले असून १९ ऑगस्ट २०२१ रोजी हे नवजात पिल्लू जन्माला आले. हे पिल्लू फक्त २५ दिवसांचे असून पालक त्याचे संपूर्णपणे संगोपन करीत आहे. त्याची लिंग तपासणी अद्याप करण्यात आलेली नाही. वयाच्या तीन महिन्यांपर्यंत, रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याने पिल्ले आजारांना बळी पडू शकतात. म्हणून प्राणीसंग्रहालयाच्या टीमकडून त्यांची अत्यंत काळजी घेतली जात आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.