Tejaswini Pandit instagram/Tejaswini Pandit
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते.
त्या फोटोला तेजस्विनी विविध कॅप्शन देऊन तिच्या भावना व्यक्त करत असते. नुकतेच तेजस्विनीने एका खास फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना तेजस्विनीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तेजस्विनीने फोटो शेअर करून कॅप्शन दिले, 'माझ्याकडे काय ती म्हणतात ती "perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं...छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या... दात दाखवून असो, वा खळखळून असो....मला ' हसायला 'आवडतं हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात... हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. ते एका चित्रपटात म्हटलंय ना, क्या पता कल हो ना हो.....!'
सिंधुताई सपकाळ, तु ही रे,देवा, येरे येरे पैसा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.