IAS Tina Dabi esakal
फोटोग्राफी

IAS Tina Dabi : IAS अधिकाऱ्यांचा थाटच निराळा! मोफत सुविधा अन् महिन्याचा एवढा पगार कमावते टीना डाबी

आज आपण टीना डाबीचा एका महिन्याचा पगार आणि आयएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधा जाणून घेणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

UPSC परीक्षेची तयारी करणारे परीक्षार्थी टीना डाबीकडे आजही इन्स्पिरेशन म्हणून बघतात.टीना डाबीने केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टीनाचा रँक पहिला होता. एका आयएस अधिकाऱ्याला शासनाकडून बऱ्याच सुविधा मिळतात. सोबतच त्यांचा पगारही बक्कळ असतो. आज आपण टीना डाबीचा एका महिन्याचा पगार आणि आयएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधा जाणून घेणार आहोत.

आयएएस टीना डाबी या महिला आयएएस अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. टीना डाबी या सध्या जैसलमेरच्या कलेक्टर आहेत. IAS टीना दाबी यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झाला. त्यांनी 2015 मध्ये UPSC मध्ये टॉप केले होते, त्यानंतर त्या सर्वत्र चर्चेत आहे. IAS टीना डाबी (IAS रिया डाबी) प्रमाणेच त्यांची धाकटी बहीण रिया डाबी देखील IAS आहे.
आयएएस टीना डाबी या राजस्थानच्या सुवर्णनगरी जैसलमेरच्या ६५व्या कलेक्टर आहेत. राजस्थान सरकार कलेक्टर पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना १.३४ लाख ते १.४५ लाख रुपये पगार देते. टीना डाबी या आधी वित्त विभागात होत्या, जिथे त्यांना 56,100 रुपये पगार देण्यात आला होता.
जिल्हाधिकारी पदावर नियुक्त अधिकाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त अनेक सुविधाही दिल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांना सरकारी घर आणि राहण्यासाठी वाहनही दिले जाते. यासोबतच त्यांना चालक आणि नोकरही दिला जातो. जिल्हाधिकाऱ्यांना घराच्या बागेसाठी माळी आणि स्वयंपाकासाठी नोकरही दिला जातो.
जिल्ह्यातील सर्वांत मोठे पद जिल्हाधिकाऱ्यांकडे असते, ज्यांना जिल्ह्याची सर्व कामे व्यवस्थितपणे सांभाळावी लागतात. कलेक्टर होण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
आयएएस टीना डाबी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आयएएस टीना डाबी यांना 'ब्युटी विथ ब्रेन' म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT