फोटोग्राफी

Relation Breakup होण्याच्या मार्गावर आहे? गर्लफ्रेंडला मनवण्याचे 6 मार्ग

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा नातेसंबंधात सगळंच गुडीगुडी नसतं. काहीवेळा कठीण प्रसंग येतात. तर बरेचदा चुकीचे संवाद आणि भांडणे होतात. यातून अनेक गैरसमज वाढत जातात. काहीवेळा प्रेमाच्या आड अहंकार आडवा येतो. तेव्हा एकमेकांना ब्लॉक करण्यापर्यंत वेळ येते. ब्रेकअप करावं असं वाटतं. पण राग विसरून कधीतरी त्याला किंवा तिला चुकीची जाणीव होते. प्रकरण खूप ताणतोय, अस वाटतं. गर्लफ्रेंडला सॉरी म्हणून पुन्हा नव्याने सुरूवात करावीशी वाटते. पण ती तर चिडलेली असते. अशावेळी तिला इंप्रेस करून तिने पुन्हा तुमच्या प्रेमात पडायला हवं असेल तर या सहा गोष्टी करा.

तिला फुलांचा गुच्छ द्या- प्रेमात असल्यावर लाल गुलबाची फुलं चांगली जादू करतात. या लाल फुलांचा गुच्छ घेऊन थेट तिच्या घरी जा. तिने दरवाजा उघडला की गुच्छ देत तिला सॉरी म्हणा. तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे. तुम्ही तिला किती मिस करत आहात, हेही कळू द्या. तुमच्या या वागण्याने तीचं मन नक्की विरघळेल.
चॉकलेट्स द्या- प्रेमात असताना एक चॉकलेट दोघांनी खाणे अनेकांना आवडते. चॉकलेट मुलींना खूप आवडतात. तिला भेटायला जाताना तिच्या आवडीचे चॉकलेट द्या. देताना सॉरी म्हणायला विसरू नका. तिला चॉकलेटचा बॉक्स भेट दिल्यावर तुम्ही तिच्याबद्दल गंभीर आहात, याची जाणीव होईल. त्यामुळे ती आनंदाने हे चॉकलेट गिफ्ट स्विकारून तुम्हाला माफ करू शकते.
कोलाज गिफ्ट करा- बऱ्याच जोडप्यांचे त्यांचे असे आवडीचे गाणे असते. त्या गाण्याच्या स्पेशल आठवणी असतात. त्याचे फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही काढलेले असाल. तिला भेटून या आठवणींचा कोलाज भेट द्या. देताना सॉरी नक्की म्हणा. यामुळे ती जुन्या आठवणीत रमून कदाचित तुम्हाला माफ करेल.
तिला पत्र लिहा- बरेचदा बोलून समज-गैरमसज आणखी वाढतात. पण पत्रामार्फत आपल्या भावना आपण अधिक चांगल्या व्यक्त करू शकतो. त्यामुळे तिला पत्र लिहून मनातील भावना सांगा. तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे, हे तिला कळू द्या. असे पत्र व्हॉट्सअप मेसेज पेक्षा अधिक जादू करेल.
बाटलीत भावना व्यक्त करा- एखादी वेगळी कल्पना करून तिचे मन जिंकू शकता. एखाद्या बाटलीत प्रेमपत्र, संदेश आणि फूल ठेवून ते तिला भेटून गिफ्ट करा. दिसायला ते खूप आकर्षक दिसत असल्याने गर्लफ्रेंडला तुम्ही रॉमेंटिक असल्याचे वाटून ती इंप्रेस होईल.
फक्त दोघेच पार्टी करा- तिच्यासाठी तुमच्या घरी किंवा तुम्हा दोघांच्या आवडत्या ठिकाणी तिला हट्टाने घेऊन जा. ति जागा जशी जमेल तशी सुशोभित करा. यावेळी तुम्ही तिच्याशी मनातल्या भावना व्यक्त करण्यास प्राधान्य द्या. तिलाही बोलतं करा. पार्टीचे वातावरण आणि गप्पा यामुळे तुमच्यातले गैरसमज दूर होऊन ति नक्की तुम्हाला माफ करेल आणि पुन्हा तुमच्या प्रेमात पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT