flirting in office esakal
फोटोग्राफी

नवऱ्यासोबत ऑफिसमध्ये कोणी फ्लर्ट करतंय का? हे नक्की वाचा

भक्ती सोमण-गोखले

तुमच्या नवऱ्याशी (husband) त्याच्या ऑफिसमध्ये कोणी फ्लर्ट (flirt) करत असेल तर बायको म्हणून तुम्हाला राग येणं अगदी साहजिक आहे. त्याच्या ऑफिसमध्येच (office) हा प्रकार चालत असल्याने तुम्हाला आणखी अवघडल्यासारखं वाटू शकतं. अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना लग्न झालेल्या पुरूषांशी फ्लर्ट करायला आवडतं. काही स्त्रिया याकडे आव्हान म्हणून तर काही मजा म्हणून बघतात. पण जेव्हा एखादी मुलगी तुमच्या नवऱ्यासोबत फ्लर्ट करतेय तेव्हा तुमचा नवरा त्याला कसा प्रतिसाद देतोय ते पाहणे महत्वाचे आहे. कारण त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा राग ढळू देऊ नका. काळजीपूर्वक वागा. जर कामाच्या ठिकाणी तुमच्या नवऱ्यासोबत कोणी फ्लर्ट करत असेल तर तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता.

तिच्याशी मैत्री करा- जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला एखादी मुलगी फ्लर्ट करतेय असं सांगतो तेव्हा त्या मुलीवर लगेच रागवू नका. उलट तिच्याशी मैत्री करा. तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही तिला खूप चांगल्या,मनमिळावू दयाळू असल्याचे जाणवेल. अशा व्यक्तीच्या नवऱ्याला जाळ्यात ओढताना त्याच्या पत्नीला दुखावताना तिला अस्वस्थ वाटू लागेल. असे केल्याने त्या मुलीच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवू शकेल.
नवऱ्याशी संवाद साधा- जर तुमचा नवरा दुसऱ्या मुलीकडे आकर्षिला गेला असेल तर तुम्हाला नवऱ्याशी सामना करताना खूप वाईट वाटू शकते. अशावेळी मनावर ताबा ठेवून नवऱ्याशी शांतपणे बोला. त्याला काही शंका आहेत का ते विचारा. ते दोघे किती जवळ आले आहेत, याबद्दल थेट विचारू नका. तुमच्या नवऱ्याला कदाचित राग येईल. पण तुम्हा दोघांना याबद्दल काय वाटते याविषयी शांतपणे संवाद साधा.
तुमच्या वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष द्या- तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर चुकीच्या वागल्या आहात का? असे असेल तर त्याचा राग आल्याने तुमचा नवरा त्या महिलेशी अनावधानाने बोलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तुमच्या संवादात दरी निर्माण झाल्याचे समजा आणि ही दरी दूर करून पुन्हा नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी बोला, डिनर डेटवर जा आणि एकमेकांवर मनापालून प्रेम करा.
त्याच्यावर विश्वास ठेवा - अशा परिस्थितीत नवऱ्यावर अविश्वास ठेवणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण, असे करणे टाळा. इथे त्या दुसऱ्या स्त्रीची चूक आहे. तुमच्या नवऱ्याची नाही. त्याने त्या स्त्रीला प्रोत्साहन दिलेले नाही, असे म्हटले तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल.
याबद्दल हसत रहा - आणखी एक करून पाहा, तुम्ही संपूर्ण परिस्थितीमुळे नवऱ्यावर शंका घेण्याऐवजी आणि राग येण्याऐवजी हसत का नाही? जो फक्त तुमचाच आहे त्याला ती आपलंस करू पाहतेय. त्यामुळे तुमचा जर नवऱ्यावर पूर्ण विश्वास असेल तर तीला फार डोक्यावर चढवू नका. पण, ही परिस्थिती डोक न फिरवता शांतपणे हाताळल्यास तुम्हाला जास्त आनंद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT