थरारक आणि कल्पनेपलिकडील चोरीच्या घटनेवर आधरित मनी हाईस्ट सारख्यासिरीज तुम्हाला आवडत असतील तुम्ही या सिरीज नक्की पाहा. चोरी, फ्रॉड, क्राईम च्या उत्तम कथानक आणि अफलातून मांडणी केलेले मास्टरपिस अशा ही सिरिज आहे.
मनी हाईस्ट' (Money Hiest) 'ला कासा दे पापेल' (La Casa De Papel) या स्पॅनिश वेब सीरिजची इंग्रजी आवृत्ती 'मनी हाईस्ट' (Money Heist) प्रचंड लोकप्रिय आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून 'प्रोफेसर' हा चोरीचा मोठा कट रचतो. सध्या जगभरात लोकप्रियता मिळवलेली ही सीरिज एकेकाळी सुपरफ्लॉप ठरली होती. मात्र 'नेटफ्लिक्स'ने या सीरिजला दत्तक घेतल्यानंतर आणि त्याचे विविध भाषेत रुपांतर केल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या या सीरिजचा पाचवा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नाऊ यू सी मी सिरिज ( Now You See Me movie series) तुम्हाला जादु आवडत असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघितला पाहिजे. या चित्रपटाची कथा मॅजिक ट्रिक्स आणि इल्युजन ट्रिक्स करणाऱ्या एका गृप भोवती फिरते जे कधी आणि कसे चोरी करतात हे कळणारपण नाही. हा चित्रपट नेटफिक्सवर उपलब्ध आहे.मिशन इम्पॉसिबल (Mission Impossible movie series) अॅक्शन, थ्रिल आणि एक रोमांचक कथानक आवडल असलेल्यांसाठी स्टार अॅक्टर टॉम क्रूझ चाहत्यांसाठी एक ट्रीट ठरतो. या चित्रपटा एकूण 6 भाग आहेत आणि प्रत्येक चित्रपटात तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळते. या चित्रपटाचे सर्व भाव तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.
इन्सेप्शन (Inception) लिओनार्डो डाय कॅप्रिओ आणि ख्रिस्तोफर नोलन अशी तगडी कास्ट असलेला हा मास्टरपिस २०१० मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.हा चित्रपट मनातील स्वप्नांवर आणि विचारांमध्ये हाईस्ट करते ज्यामुळे कधीही न पाहिलेल्या परिस्थीला सामोरे जावे लागते ज्यामुळे शेवट काय होईल हे सांगताच येत नाही. हा चित्रपट अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. कॅच मी ईफ यु कॅन (Catch Me If You Can) कॅच मी ईफ यु कॅन हा क्राईम-ड्राम आहे जो 2002 साली प्रदर्शित झाला होता. लिओनार्डो डिकॅप्रिओ आणि टॉम हँक्स मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा एका तरुणाच्या आसपास फिरत आहे, जो कोट्यावधी रुपयांच्या पैशाची कमाई करतो. हा चित्रपट नेटफ्लिस वर उपलब्ध आहे. ओझार्क( Ozark) ओझार्क ही सर्वात नावजलेली क्राईम-ड्राम सिरीज आहे. या सिरिज कथा एक फसलेल्या मनी लॉन्ड्रीग स्कॅममध्ये एक फॅमिली कशी गुरफटत जाते यावर आधारीत आहे. बॅकस्टॅबिंग आणि बिल्डिंग क्लायमॅक्स हेच प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या सीरीजचे 4 भाग असून 5 भाग लवकरच येणार आहे. नेटफिल्कवर ही सिरीज उपलब्ध आहे. प्रिझन ब्रेक (Prison Break) प्रिझन ब्रेक या चित्रपटांची कथा दोन भावांभोवती फिरते, ज्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी मरेपर्यंत कारावासाची शिक्षा झाली आहे.त्यामध्ये भावाला निर्दोश सिध्द करण्यासाठी आणि जेलमधून बाहेर काढण्यासाठी एक योजना आखतात. या सिरीजचे 6 भाग आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सिरिज उपलब्ध आहे. ओशन्स मुव्ही सिरीज (Ocean’s movie series) ओशन्स मुव्ही सिरीज ही चित्तथरारक चोरीवर आधारित चित्रपटापैकी सर्वोतम मानला जाते. या चित्रपटाची कथा एका गृपभोवती फिरते जे एमईटी गाला, लास वेगास कॅसिनो आणि अशाच अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक सिनेमात अगदी सहज चोरी करतात. हा चित्रपट नेटफिक्सवर उपलब्ध आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.