फोटोग्राफी

'कोंडीची शाळा' सुटणार केव्हा?

सकाळ डिजिटल टीम

विद्यार्थी- पालकांचा जीव मुठीत
पिंपरी-चिंचवडः शाळा-महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात होणारी तुडुंब गर्दी,वाहतूक व्यवस्थेचा आणि शिस्तीचा बोजवारा यांमुळे विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागतो. उदासीन पोलीस व शाळा प्रशासन पहाता मोठा अपघात होण्याची हे वाट पहात आहेत का, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे. म्हाळसाकांत विद्यालय परिसरातील चित्र यासाठी पुरेसे बोलके उदाहरण आहे. कमी अधिक फरकाने सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. रस्त्याच्या कडेला दुतर्फा होणारे पार्किंग वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. त्यातही भरधाव व कर्णकर्कश आवाज करीत जाणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थी पालकांच्या मनात भीती निर्माण करतात. तसेच अपघाताला निमंत्रण यातून मिळत आहे. विद्यार्थ्यानी भरगच्च रिक्षा, दुचाकीवर चार-चार विद्यार्थी घेऊन जाणारे पालक, हे धोकादायक असतानाही नेहमी दिसणारे चित्र. शाळा परिसरात असणारे ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी ना शाळा प्रशासनाचे, ना वाहतूक पोलिसांचे प्रयत्न. आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय परिसरात पदपथ टपऱ्यानी व्यापले आहेत. तसेच शेजारीच केलेली पार्किंगमुळे पदपथावरून चालताही येत नाही.येथे रस्ता ओलांडून जाणे जिकिरीचे असते. एकूणच शाळा परिसरातील परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी आहे आणि प्रशासन ढिम्म आहे.( संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT