फोटोग्राफी

श्रोत्यांसाठी सजली "स्वरपंढरी'

सकाळ डिजिटल टीम
"सवाई'ची तयारी पूर्ण; सनईच्या मंगलमय स्वरांनी आजपासून सुरवात


"सवाई'ची तयारी पूर्ण; सनईच्या मंगलमय स्वरांनी आजपासून सुरवात

पुणे : शास्त्रीय संगीतातील "स्वरयज्ञ' समजला जाणारा "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' कधी सुरू होणार, याची उत्सुकता अवघ्या काही तासांनंतर संपणार आहे. ही उत्सुकता सोबत घेऊन आणि स्वरप्रभूंचे जादुई स्वर अनुभवण्यासाठी ठिकठिकाणांहून श्रोते पुण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे "स्वरपंढरी' आत्तापासून सजली आहे; येथे उद्यापासून (ता. 7) वेगवेगळ्या स्वरांचे "दर्शन' श्रोत्यांना घेता येणार आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित "सवाई गंधर्व' उद्यापासून रविवारपर्यंत (ता. 11) रमणबाग शाळेच्या मैदानावर रंगणार आहे. यंदाच्या महोत्सवात जुन्या आणि नव्या पिढीतील तब्बल 29 कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असली, तरी वेगवेगळ्या कामांवर रात्री उशिरापर्यंत शेवटचा हात फिरवला जात होता. त्यामुळे श्रोत्यांबरोबरच स्वरमहालालाही आता महोत्सवाची उत्सुकता लागली आहे.

संगीतातील दिग्गजांची आठवण करून देणारा आकर्षक स्वरमंच...स्वरप्रभूंबरोबरच श्रोत्यांसाठी अंथरलेले "रेड कार्पेट'...ठिकठिकाणी लावलेले नक्षीदार झुंबर...प्रत्येक श्रोत्याला स्पष्ट ऐकू यावे म्हणून उभारलेली अत्याधुनिक ध्वनियंत्रणा...ठिकठिकाणी उभारलेले एलईडी वॉल...70 हजार चौरस फुटांवरील मांडवात आठ हजारांहून अधिक खुर्च्या...भारतीय बैठकीचीही उत्तम व्यवस्था...अशी महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बिस्मिल्ला खॉं यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महोत्सवाचा पहिला दिवस त्यांनाच समर्पित करण्यात आला आहे. त्यांचे शिष्य एस. बल्लेश आणि कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने महोत्सवाची सुरवात होईल.

सवाईत आज
- बिस्मिल्ला खॉं यांचे शिष्य एस. बल्लेश आणि कृष्णा बल्लेश यांचे सनईवादन
- पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्या गौरी पाठारे यांचे गायन
- उस्ताद इमरत खान यांचे शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे सूरबहार व सतारवादन
- किराणा घराण्याचे गायक पं. गणपती भट यांचे गायन
(स्थळ : रमणबाग शाळेचे मैदान, वेळ ः दुपारी 4 ते रात्री 10)

"षड्‌ज'मध्ये आज
- दिग्दर्शक व्ही. राजगोपाल यांचा कर्नाटकी गायिका सुब्बलक्ष्मी यांच्यावरील माहितीपट
- दिग्दर्शक डॉ. के. प्रभाकर यांचा शहनाईवादक उस्ताद बिस्मिला खॉं यांच्यावरील माहितीपट
(स्थळ ः सवाई गंधर्व स्मारक, शिवाजीनगर, वेळ ः सकाळी 10 ते दुपारी 12.30)

महत्त्वाचे
- पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन रमणबागेच्या पटांगणावर "वॉटरप्रुफ मांडव'
- रानडे बालक मंदिर येथे दुचाकीसाठी वाहनतळ तर चारचाकी वाहने नदीपात्रात लावता येतील
- कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, कर्वेनगर, कोथरूड डेपो मार्गावरील श्रोत्यांसाठी रमणबागपासून पीएमपीची बस सुविधा
(शहाजी जाधव:सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT