तुम्ही अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील, पण मिशा असलेला पक्षी तुम्ही कधी पाहिलाय, नाही ना?
तुम्ही अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील, पण मिशा असलेला पक्षी तुम्ही कधी पाहिलाय, नाही ना? अशा पक्ष्याचं नाव आहे इंका टर्न (Inca Tern). हा पक्षी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. इंकाला पिळदार मिशा असून हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हा पक्षी दिसायलाही खूप सुंदर आहे. हा पक्षी विशेषतः पेरू आणि चिलीमध्ये आढळतो. याचं संपूर्ण शरीर राखाडी असून दोन्ही बाजूला पांढर्या मिशा आहेत. त्याची चोच आणि पाय केशरी रंगाचे आहेत, तर 40 सेमी लांबीचा हा पक्षी केवळ खडकांच्या जवळच राहत असतो.इंकाच्या चोचीजवळ दिसणारी मिशी पक्षी प्रौढ झाल्याचं सूचित करते. या पक्षाला मासे खायला खूप आवडतात. शिकार करण्यातही तो पटाईत आहे. लांब चोचीमुळं तो एका झटक्यात मासे पकडतो.इंका टर्न हा पक्षी एका वेळी एक किंवा दोन अंडी घालतो. याची पिल्ले अंड्यातून बाहेर यायला 4 आठवडे लागतात. याचा आवाज मांजरीच्या आवाजासारखा आहे.अमेरिका बर्ड कॉन्झर्व्हन्सीच्या (US Bird Conservation) मते, जगभरात इंका टर्नची संख्या कमी होत आहे. त्याच्या संवर्धनासाठी 2009 मध्ये पेरू सरकारनं गुआनो बेट आणि केप्स नॅशनल रिझर्व्हमध्ये मोहीम सुरू केली. मात्र, अद्याप पक्षांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.