Exercise For Height Growth 
फोटोग्राफी

उंची वाढवायचीय? सकाळी 'ही' पाच आसने करा

सकाळ डिजिटल टीम

योगासने ही प्रभावी स्ट्रेचिंग व्यायाम आहे. तुमची उंची वाढवण्यास योगासने तुम्हाला मदत करू शकतो. अनेकांची उंची कमी असते. अशावेळी ती कशी वाढवायची ते लोकांना कळत नाही. पण, जर तुम्ही तरुण असाल तर उंची वाढवण्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात. योगाभ्यासामुळे शरीर ताणले जाते. उंची वाढवण्यासाठी व्यायामाचा अनेकांना फायदा होतो. तसेच संतुलित आहार, योग्य प्रमाणात झोप, शारीरिक व्यायाम केल्यास त्याचाही फायदा होतो.

1) ताडासन- ताडासन हे सर्वात महत्त्वाच्या योगासनांपैकी एक आहे जर एखाद्याने ही योगमुद्रा योग्य तंत्राने केली तर त्याची उंची वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. ताडासनामुळे बोटांवर पुरेसा ताण येतो. त्याच्या नियमित अभ्यासामुळे तुमची उंची वाढण्यास मदत मिळू शकते. तसेच योग्य तंत्र - दृष्टिकोन ठेवून या आसनाचा नियमित सराव केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. अंगठ्यापासून बोटांपर्यंत शरीरातील अतिरिक्त चरबीही या आसनामुळे कमी होऊ शकते.
2) त्रिकोणासन - त्रिकोणी मुद्रा आणि त्याची वेगवेगळी रूपे शरीराला ताणण्यासाठी पुरेशी आहेत. त्रिकोणासनामुळे तुमचे स्नायू, नसा ताणल्या जातात. तसेच हाडांवरही परिणाम होतो. या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे तुमची उंची वाढण्यास मदत होते.
3) उत्थिता पार्श्वकोणासन- हे आसन केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच सहनशक्ती वाढवण्यास, शरीराला टोन करण्यास आणि उंची वाढविण्यात हे आसन मदत करते. वजन कमी करण्यासाठी हे आसन चांगले आहे. तसेच छाती वाढवण्यासाठी ते योग्य मानले जाते. तसेच हे आसन केल्यामुळे कंबर आणि नितंबांभोवतीची चरबी कमी होते.
4) वीरभद्रासन - हे योग आसन सर्वात शक्तिशाली योग आसनांपैकी एक आहे. हे आसन केल्याने संपूर्ण शरीरावर ताण येतो. त्यामुळे याचा सराव करण्यासाठी लवचिकता गरजचेची आहे. या योगमुद्रेचा नियमित सराव केल्यास उंची वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच तुमचे वजन कमी करण्यासाठी हे आसन फायद्याचे आहे.
5) यस्तिकासन- या आसनाचा सराव आणि फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत. जर तुम्ही उंची वाढविण्याच्या प्रयत्नात असाल तर वर सांगितल्याप्रमाणे योगासने करून शेवटी हे आसन करावे. तुमच्या योगगुरूने ठराविक कालावधीसाठी हे आसन किती वेळ करायचे ते सांगितल्यास उंची वाढण्यास मदत होते. वरील मॉड्युलमधली ही एकमेव योग मुद्रा आहे, जी दीर्घकाळ टिकवून ठेवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT