ind vs aus test venkatesh prasad on kl rahul  
फोटोग्राफी

Venkatesh Prasad : वेंकीनं पाकिस्तानचे दात घातले होते घशात! अजुनही ती इनिंग...

व्यंकटेश प्रसादने केएल राहुलच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह केले यानंतर...

Kiran Mahanavar

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याची बरीच चर्चा चालु आहे. त्याने टीम इंडियातील सलामीवीर केएल राहुलच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह केले. यानंतर त्याचे आकाश चोप्रासोबत सोशल मीडियावर जोरदार वादावादी झाले.

व्यंकटेश प्रसाद नव्वदच्या दशकात टीम इंडियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज होते. 1996 आणि 1999 च्या विश्वचषकात तो संघाचा भाग होता. यादरम्यान त्याने 33 कसोटीत 96 आणि 161 एकदिवसीय सामन्यात 196 विकेट घेतल्या.

व्यंकटेश प्रसाद हा भारतीय खेळाडूंपैकी एक आहेत ज्यांचे नाव लॉर्ड्स ऑनर बोर्डवर आहे. 1996 मध्ये या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने 76 धावांत 5 विकेट घेतल्या होते. भारताने इंग्लंडचा पहिला डाव 344 धावांवर रोखला होता. त्यानंतर सौरव गांगुलीच्या शतकाच्या जोरावर 429 धावा केल्या. मात्र अखेर हा सामना अनिर्णित राहिला.
1999च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. मँचेस्टरच्या मैदानावर भारतीय संघाला केवळ 227 धावा करता आल्या. पण व्यंकटेश प्रसादने पाकिस्तानचे दात घशात घातले होते. त्याने सईद अन्वर, सलीम मलिक, इंझमाम-उल-हक, अझर महमूद आणि वसीम अक्रम यांची 9.3 षटकांत 27 धावा देत विकेट घेतल्या. हा सामना 47 धावांनी जिंकला आणि प्रसाद सामनावीर ठरला.
1999मध्ये चेन्नई येथे भारत आणि पाकिस्तानची कसोटी खेळली गेली होती. हा तोच सामना होता ज्यात सचिन तेंडुलकरने 136 धावा करूनही भारत 12 धावांनी हरला होता. पाकिस्तानची दुसऱ्या डावाची धावसंख्या एकावेळी 4 बाद 275 अशी होती आणि संपूर्ण संघ लवकरच सर्वबाद झाला होता. यादरम्यान प्रसादने एकही धाव न देता 5 बळी घेत पाकिस्तानचा डाव गुंडाळला. त्याने संपूर्ण डावात 33 धावांत 6 विकेट घेतल्या.
हा केवळ व्यंकटेश प्रसादच नाही तर भारतीय क्रिकेटमधील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक होता. 1996च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानच्या अमीर सोहेलने व्यंकटेश प्रसादला चौकार मारला. त्यानंतर त्याने बॅट सीमारेषेकडे दाखवत प्रसादला चिडवण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्याच चेंडूवर त्याने आमिर सोहेलला बोल्ड केले. भारताने तो सामना जिंकला आणि प्रसादने टॉप-4 पैकी तीन फलंदाजांना बाद केले.
1996मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्यंकटेश प्रसादने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात 60 धावा आणि दुसऱ्या डावात 93 धावा देऊन त्याने या विकेट घेतल्या. तरीही भारतीय फलंदाजी अपयशी ठरली आणि टीम इंडियाला सामना गमवावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT