MS Dhoni ended the careers of these 5 Cricketers
MS Dhoni ended the careers of these 5 Cricketers  sakal
फोटोग्राफी

दोस्त दोस्त ना रहा! धोनीमुळे 'या' दिग्गजांची संपली कारकिर्द?

Kiran Mahanavar

महेंद्रसिंग धोनी जेव्हापासून भारतीय संघात आला आहे, तेव्हापासून संघाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. धोनी हा आतापर्यंत भारतीय संघातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने संघासाठी तीन ICC ट्रॉफी (ICC TROPHY) जिंकल्या आहेत. 2011 साली विश्वचषक (2011 WORLD CUP) जिंकल्यानंतर धोनीने संघामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिली आणि त्यांना क्रिकेट जगतात एका वेगळ्या स्थानावर नेले. त्याचबरोबर धोनीने अनेक खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त करून त्यांना संघातून बाहेर काढल्याचे काही लोकांचे मत आहे.

2011 चा वर्ल्ड हिरो ठरलेल्या युवराज सिंहच्या वडिलांनी धोनीवर उघडपणे बोले होते. 2011 मध्ये युवराज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. युवराज सिंहचे वडील योगराज सिंग म्हणाले होते की धोनीने त्यांच्या मुलाचे करिअर खराब केले आहे. कॅन्सरमधून बरा झाल्यानंतर युवराज भारताच्या संघात परतला, पण तो संघात जास्त राहू शकला नाही.
2011 च्या वर्ल्ड फायनलमध्ये महत्त्वाची खेळी खेळणाऱ्या गौतम गंभीरने याआधी धोनीबद्दल म्हटलं होतं की विश्वचषकाचं श्रेय फक्त एकाच खेळाडूला देऊ नये. यानंतर धोनीने गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना संथ क्षेत्ररक्षक करतात असा बोलला होता.
संघाचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेळप्रसंगी कहर केला आहे. सेहवाग असा खेळाडू होता जो अनेकदा त्याच्या डावाची सुरुवात ड्रेसिंग रूम मधून करत होता. संघाबाहेर राहिल्यानंतर सेहवागने धोनीबद्दल सांगितले होते की, तो संघातील कोणत्याही खेळाडूला न कळवता आपले निर्णय घेतो आणि मीडियामध्येही बोलतो.
मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाला आयपीएल 2022 मध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. रैना धोनीला आपला चांगला मित्र मानतो. रैनाला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जनेही विकत घेतले नव्हते.
रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली जडेजाने संघाला पूर्णपणे बुडवले. आता त्याला संघातून सोडण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT