बदक हा पक्षी बहुतेकदा आपल्याला पाण्यामध्येच पाहायला मिळतो.
बदकाची पिसं नेहमी स्वच्छ आणि कोरडी असतात, त्यामुळं ते आपल्या 'वाटरप्रूफ' आहेत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हे बदक नेहमी स्वच्छ असण्याचं कारण तुम्हाला माहितीय? चला तर मग, जाणून घेऊ बदक स्वच्छ आणि त्याची पिसं पाण्यात का ओली होत नाहीत ते..बदक (Duck) हा पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयातील पक्षी आणि बदक हा पक्षी बहुतेकदा आपल्याला पाण्यामध्येच पाहायला मिळतो. बदक हा अॅनॅडीटी कुळातील पक्षी असून या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव अॅनस प्लॅटोर्हिक्स डोमेस्टीकस (Anas Platorhix Domesticus) आहे. या पक्ष्याचं वर्णन करायचं म्हंटलं, तर या पक्ष्याची शरीर रचना अगदी स्थूल असते, त्याचे पाय आणि मान आखूड असते. आकार 55 ते 60 सेंटी मीटर आणि या पक्ष्याचे वजन 1 किलो पर्यंत असते.तुम्ही अनेक वेळा पाण्यात तरंगणारे बदक पाहिले असतील. पण, विशेष म्हणजे दिवसभर पाण्यात राहिल्यानंतरही बदकाची पिसं ओली होत नाहीत, ती नेहमी कोरडी राहतात.मग, तुम्ही कधी विचार केलाय, की बदकाची पिसं स्वच्छ का राहतात आणि ओली का होत नाहीत. तर याचं कारण असं आहे की, या पक्ष्यांच्या पंखांना तेलकटपणा असतो, त्यामुळं ते जरी पाण्यामध्ये पोहत असले तरी या पक्ष्यांचे पंख ओले होत नाहीत.बदकाला जरी आपण कित्येकदा पाण्यामध्ये पोहताना पहिले असले तरी हे पक्षी उत्तम प्रकारे उडू ही शकतात.बदक हा पक्षी धृव प्रदेश सोडला तर जगभरामध्ये सगळीकडे आढळतात. जगभरामध्ये बदकाच्या 115 ते 120 जाती आहेत आणि भारतामध्ये सिल्हेटा मेटा आणि इंडियन रनर ह्या बदकाच्या जाती प्रसिध्द आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.