आयुष्यात असे काही प्रसंग येतात, की आपल्याला एकट्यानं प्रवास करायला भाग पाडतात. अनेकवेळा आपण जीवनाच्या गजबजाटात अडकतो आणि एकटंच फिरायला जावंसं वाटतं. आम्ही तुम्हाला अशी ठिकाणं सांगू, जिथं तुमचं मन रमून जाईल..
'झिरो व्हॅली' भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत शीर्षस्थानी येतं. झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेशमध्ये असून हे ठिकाण भातशेतीसाठीही खूप प्रसिद्ध आहे. 'झिरो' हे अरुणाचल प्रदेशातील खूप जुनं शहर आहे, जे 'नंदनवन' म्हणूनही ओळखलं जातं.सिक्कीममधील 'कंचनजंगा' हे जगातील सर्वात उंच शिखर पर्यटकांना आकर्षित करतं. इथं महिला एकट्या देखील फिरू शकतात आणि ट्रेकिंगचा आनंदही घेऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टीनंही हे ठिकाण महिलांसाठी सर्वोत्तम आहे.माजुली बेट हे असं ठिकाण आहे, जिथं मुली केव्हाही एकट्या फिरू शकतात. हे बेट आसाममध्ये असून जोरहट शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे सुंदर ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं.गोकर्ण हे शहर एकट्याला फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. अविवाहित मुली देखील इथं केव्हाही प्रवास करू शकतात, हे शहर पूर्णपणे सुरक्षित आहे. गोकर्ण हे भारतीय तीर्थक्षेत्रांसाठीही प्रसिद्ध आहे. जर तुम्ही शांतता शोधत असाल, तर तुम्ही एकदा इथं जाच.राजस्थानातील जैसलमेरला भेट दिली नसेल, तर लवकर भेट देण्याचा प्लान करा. जैसलमेरला ‘द गोल्डन सिटी’ म्हणूनही ओळखलं जातं. इथली संस्कृती खूप प्रसिध्द असून इथं पाहण्यासाठी अनेक खास ठिकाणं आहेत. भारतात येणाऱ्या महिलांसाठी हे शहर पूर्णपणे सुरक्षित आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.