IND vs AUS 1st Test  ESAKAL
फोटोग्राफी

IND vs AUS 1st Test : भारताचे हे 5 पांडव उडवणार धुरळा; कांगारूंची नागपुरात होणार हालत खराब

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पांढऱ्या कपड्यातील द्वंद्व 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित सेना कांगारूंना आपला दम दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. नागपूरचा जामठा स्टेडियमवरील पहिला सामना हा कसोटी मालिकेचा नूर सेट करणार ठरू शकतो. या सामन्यात भारताकडून हे 5 खेळाडू गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

उमेश यादव : लोकल बॉय असलेला उमेश यादव कसोटीत भारतात गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आला आहे. भारतीय खेळपट्टीवर त्याचा रिव्हर्स स्विंग हा कांगारूंसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. जर तो प्लेईंग 11 मध्ये खेळला तर त्याचा हाच अनुभव पहिल्या सामन्यात भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल : भारताचा हा युवा सलामीवीर वनडे आणि टी 20 मध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो कसोटी मालिकेत देखील खेळेल याची शक्यता दाट आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये नुकतेच द्विशतक ठोकले आहे. तर टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम देखील केला आहे. तो नागपूरच्या पाटा खेळपट्टीवर कांगारूंच्या नाकत दम करू शकतो.
रविंद्र जडेजा : जवळपास 5 महिन्यांनी भारतीय संघात परतलेला रविंद्र जडेजा झोकात पुनरागमन करण्यासाठी उतावळा झाला असेल. नुकतेच त्याने सौराष्ट्रकडून खेळताना एका डावात 7 विकेट्स घेत आपला मॅच फिटनेस सिद्ध केला होता.
केएस भरत : ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतला पहिल्या कसोटीमध्ये संधी मिळू शकते. जर तो खेळला तर तर फलंदाजीत देखील तो चांगला दम काखवू शकतो.
कुलदीप यादव : न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत कुलदीप यादवने आपल्या सुधारलेल्या गोलंदाजीचा आणि फॉर्मचा नमुना पेश केला होता. आता अशीच कामगिरी तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीत देखील करून दाखवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT