Sushmita, Harnaaz and Lara
'मिस युनिव्हर्स २०२१' या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत २१ वर्षीय हरनाज संधू विजयी ठरली आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला हा मान मिळाला आहे. याआधी भारताच्या दोघींनी हा किताब जिंकला होता.
१९९४ मध्ये सुष्मिता सेनने 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला होता. 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकणारी पहिली भारतीय सुष्मिता सेन ठरली. त्यानंतर सहा वर्षांनी लारा दत्ताने पुन्हा 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट भारतात आणला. लारा दत्तानंतर तब्बल २१ वर्षांनी पंजाबच्या हरनाज संधूने 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला. २००० मध्ये लारा दत्ताने ही सौंदर्यस्पर्धा जिंकली होती. २१ वर्षीय हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत भारताचं नाव उंचावलं. हरनाज सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने 'फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९'चा किबातसुद्धा आपल्या नावे केला आहे. हरनाजने काही पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.