Big Budget Movies News Big Budget Movies News
Big Budget Movies News एकीकडे अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ४०० कोटींचे बजेट या चित्रपटाचे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपटांवर एक नजर टाकू या...
२.० : वर्ष २०१८ मध्ये शंकर दिग्दर्शित चित्रपट २.० प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०१० मध्ये आलेल्या रोबोट चित्रपटाचा सिक्वेल होता. २.० मध्ये अक्षय कुमार आणि रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी होते.पद्मावत : संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होते. २१५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटावर बराच गदारोळ झाला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.ठग्स ऑफ हिंदोस्तान : आमिर खान, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख स्टारर चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते. २१० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकला नाही.टायगर जिंदा है : २०१७ मध्ये ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ होते. २१० कोटींचा हा चित्रपट अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता. टायगर ३ मध्ये इमरान हाश्मी सलमान-कतरिनासोबत दिसणार आहे.बाहुबली : कटप्पाने बाहुबलीला का मारले, हा प्रश्न चित्रपटासह सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली - द बिगिनिंगचे बजेट १८० कोटींचे होते.बाहुबली २ : एसएस राजामौली यांच्या बाहुबली २ - द कन्क्लुजन या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २१० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने जवळपास दुप्पट कमाई केली. कटप्पाने बाहुबलीला का मारले हे या चित्रपटानंतरच प्रेक्षकांना कळले.प्रेम रतन धन पायो : सलमान खानला सूरज बडजात्यासोबत पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा २०१५ मध्ये पूर्ण झाली. प्रेम रतन धन पायो या चित्रपटात सलमानसोबत सोनम कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होती. १८० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.धूम ३ : धूम मालिकेचा तिसरा भाग ‘धूम ३’मध्ये आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत होता. त्याचबरोबर या चित्रपटातील आमिरची दुहेरी भूमिका चाहत्यांसाठी पर्वणीच होती. १७५ कोटींच्या बजेटच्या या चित्रपटात कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा देखील होते.दिलवाले : बऱ्याच दिवसांनी शाहरुख खान आणि काजोल दिलवाले चित्रपटात एकत्र दिसले होते. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे बजेट १६१ कोटी रुपये होते. चित्रपटात शाहरुख-काजोलसोबत वरुण धवन आणि कृती सनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. रोहित शेट्टीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.बँग बँग : बँग बँग हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात हृतिकसोबत कतरिना कैफ दिसली होती. बँग बँगचे बजेट १६० कोटी होते. या चित्रपटासोबतच संगीतही प्रेक्षकांना आवडले होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.