Indian Pacer Umesh Yadav Instagram Status Gone Viral  ESAKAL
फोटोग्राफी

Umesh Yadav : मला फसवू शकता मात्र देव सगळं पाहतोय लक्षात ठेवा! वेगवान गोलंदाजांचा निवडसमितीला बाऊन्सर

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतेच न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली. या घोषणेनंतर अनेक खेळाडूंनी निवडसमितीवर नाराजी व्यक्त केली. पृथ्वी शॉ, रवी बिश्नोई, नितीश राणा आणि उमेश यादवने देखील आपल्या सोशल मीडियावर स्टेट्स ठेवत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उमेश यादवने तर निवडसमितीला बाऊन्सरच टाकला.

उमेश यादवने काऊंटी क्रिकेटमध्ये प्रभावी गोलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधले होते. मात्र निवडसमितीने बांगलादेशविरूद्धच्या कसोटी संघात 16 वा खेळाडू म्हणून त्याची निवड केली. उमेशला काऊंटी क्रिकेटमधील कामगिरीनंतर वनडे आणि टी 20 संघात पुनरागमनाची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. त्यानंतर त्याने 'तुम्ही कदाचित मला फसवू शकता मात्र देव सगळं पाहतोय हे लक्षात ठेवा.' अशी स्टोरी ठेवत नाराजी व्यक्त केली.
याचबरोबर रवी बिश्नोईने देखील 'पुनरागमन हे धक्क्यापेक्षा कधीही शक्तीशाली असतं.' असा स्टेट्स ठेवला. टी 20 वर्ल्डकप संघात स्टँड बाय असलेल्या रवी बिश्नोईला न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.
दुसऱ्या बाजूला पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धा गाजवल्या असताना देखील त्याचा न्यूझीलंड आणि बांगलादेशविरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. यानंतर त्याने साई बाबांचा फोटो शेअर करत 'साई बाबा, मला आशा आहे की तू सर्व पाहत आहेस.' असा स्टोरी ठेवली होती.
नितीश राणाने देखील स्टेट्स ठेवत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT